Shirdi , Raj Thackeray , Sai Baba , Sai Baba Temple saam tv
महाराष्ट्र

Shirdi: एकच साहेब राज साहेब, राज साहेब...जय जय श्री राम...; राज ठाकरेंचे जाेरदार स्वागत (पाहा व्हिडीओ)

साई बाबा यांचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे नाशिकला रवाना हाेणार आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- डाॅ. माधव सावरगावे, सचिन बनसाेडे

Raj Thackeray : मनसे (mns) प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) हे आज शिर्डी येथील साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आले आहेत. राज ठाकरे यांचे काही वेळापुर्वी शिर्डी येथील विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचा जयघाेष करीत परिसर दणाणून साेडला. (Breaking Marathi News)

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भाजप खासदार सुजय विखे पाटील हे देखील शिर्डी विमानतळावर उपस्थित हाेते. राज ठाकरे यांचे विमानतळावर आगमन हाेताच त्यांचे घाेषणांनी स्वागत केले. त्यानंतर एका लहान मुलाने राज ठाकरे यांना पगडी देण्याचा प्रयत्न केला. त्याची धडपड पाहून राज यांनी पगडी घेत परिधान केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्री राम, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असाे, एकच साहेब राज साहेब अशा घाेषणा दिल्या.

राज ठाकरे यांच्या समवेत पत्नी शर्मिला, मनसेचे संघटक बाळा नांदगावकर हे साेबत आहेत. तब्बल दोन वर्षानंतर राज ठाकरे हे शिर्डीत साईंचे दर्शन घेण्यासाठी आले आहेत. राज यांची नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर ते आज साईंच्या चरणी आले आहेत. साईंचे दर्शन घेतल्यानंतर ते नाशिकला रवाना हाेणार आहेत. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Human anatomy facts: मानवी शरीरात किती रक्तवाहिन्या असतात? जाणून घ्या आकडा

Manoj Jarange: जीआर फक्त निमित्त, काहीतरी मोठा डाव शिजतोय; मनोज जरांगेंना संशय

Sanjay Raut : त्यांनी राजन विचारेंचे पाय धुतले पाहिजे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; Video

Jalgaon : दीड वर्षांपूर्वी झाला विवाह; माहेरी आलेल्या विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पित्याचा सासरच्यांवर गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: हिंगोलीत निघाला बंजारा समाजाचा मोर्चा, हजारो नागरिक सहभागी

SCROLL FOR NEXT