पूरग्रस्तांना मदतीचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आवाहन SaamTv
महाराष्ट्र

पूरग्रस्तांना मदतीचे राज ठाकरेंचे आवाहन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी महाराष्ट्र सैनिकांना 'कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करा' असे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पावसाने कोकणासह Konkan पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पुरग्रस्तांच्या समस्यांच्या जाणिवेतून असंख्य महाराष्ट्र सैनिकांचे मदतीचे हात पुढे आले आहेत.

हे देखील पहा -

मनसे नेते बाळा नांदगावकर Bala Nandgaonkar यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी भायखळा विधानसभा तसेच एकलव्य फाउंडेशन अध्यक्षा सृष्टी नांदगावकर यांच्या वतीने सहाय्यता सामुग्री व जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त भागातील लोकांना मदत स्वरूपात पाठवण्यात येणार आहेत.

पूरग्रस्तांना सहाय्यता सामुग्रीमध्ये पॅक केलेले अन्न, प्रथमोपचार किट, ब्लँकेट, कपडे, खाऊ, पाण्याच्या बाटल्या व भांडी अश्या स्वरूपाच्या जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त भागातील लोकांना मदत म्हणून देण्यात येणार आहेत. पूरग्रस्त भागातील गरजू लोकांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, त्यामुळे जमेल तेवढी मदत करा असे आवाहन मनसे MNS नेते Leader बाळा नांदगावकर केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT