MNS workers vandalising the Night Riders dance bar in Panvel after Raj Thackeray’s fiery speech on bar culture in Raigad. Saam Tv
महाराष्ट्र

शिवरायांच्या राजधानीत सर्वाधिक डान्सबार, राज ठाकरेंच्या विधानानंतर 'खळ-खट्याक

Raj Thackeray Statement On Dance: राज ठाकरेंच्या एका विधानानं पनवेलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी खळ-खट्याक केलयं. राज ठाकरेंनी रायगडमधील डान्सबारसंदर्भात काय विधान केलं?

Suprim Maskar

ही दृश्य आहेत, पनवेलमधल्या नाईट रायडर्स या डान्सबारच्या तोडफोडीची.. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या एका विधानानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले... राज ठाकरेंनी रायगडमधील डान्सबारचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मध्यरात्री पनवेलमध्ये सुरु असलेल्या बारमध्ये 'खळ खट्याक' स्टाईलमध्ये तोडफोड केली.

मनसेकडून डान्सबारची तोडफोड

मनसेचं खळखट्ट्याक

शिवरायांच्या राजधानीत सर्वाधिक डान्सबार'

दरम्यान रायगड जिल्ह्यात किती बार आहेत? पाहूयात

रायगड'मध्ये बारचा सुळसुळाट

रायगड जिल्ह्यात एकूण 536 बार

खारघरपासून पळस्पे, कोनपर्यंत 24 पेक्षा जास्त बार

पनवेल तालुक्यात 18 डान्सबार

पनवेल, खोहोळी परिसरात डान्सबारचा सुळसुळाटपनवेलमधील डान्सबार तोडफोड प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान सरकारचं डान्सबार चालवतंय, अशी टीका मनसेच्या संदीप देशपांडेंनी केलीय.. तर दुसरीकड़े अनाधिकृत डान्सबारवर कारवाई करणार असल्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी मांडलीय...

तरुणाईला उध्वस्त करणारे आणि अनेकांचे संसार मातीमोल झाल्यामुळे पनवेल भागातील डान्सबार बाबत स्थानिकांनीही वेळोवेळी आवाज उठवला. मात्र राजकीय आणि पोलिस प्रशासनाचा वरदहस्त असल्यामुळेच डान्सबार खुलेआम सुरु असल्याचा आरोप होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात डान्सबारची वाढती संख्या निश्चितच चिंता वाढवणारी आहे. लाडक्या बहिणींचे संसार देशोधडीला जाण्यापासून वाचवण्यासाठी डान्सबार बंदी लागू आहे. मात्र ती केवळ कागदावरच...मनसेच्या खळखट्याक नंतर तरी सरकारला जाग येणार का?हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नोकरीच्या बाबतीत जवळचे लोक खोडा घालणार; मेषसह 5 राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

September Grah Gochar: सप्टेंबरमध्ये सूर्यासह ४ ग्रहांच्या चालीत होणार बदल; 'या' राशींना मिळणार नव्या नोकरीच्या संधी

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

SCROLL FOR NEXT