Raj Thackeray Ratnagiri speech
Raj Thackeray Ratnagiri speech saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray speech: मला वाटतं त्यांनी खरच राजीनामा दिला होता, पण यांचं वागणं पाहून... राज ठाकरेंकडून अजित दादांची मिमिक्री

Chandrakant Jagtap

Raj Thackeray On Ajit Pawar: राज ठाकरे यांची आज रत्नागिरीमध्ये जाहीर सभा सपन्न झाली. यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्यांना हात घातला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शरद पवारांच्या राजीनाम्यावरून अजित पवारांना टोला लगावला. शरद पवारांनी खरच राजीनामा दिला होता, पण अजित पवारांचं वागणं पाहून त्यांनी विचार बदलला असा टोला राज ठाकरेंनी अजित पवारांना लगावला.

राज ठाकरे म्हणाले, मला वाटतं त्यांनी खरच राजीनामा दिला होता, पण अजित पवारांचं वागणं पाहून त्यांनी मागे घेतला असावा. हे आत्ताच असे वागताहेत, तर पुढे कसे वागतील असे त्यांना वाटले असावे. जवळपास आतून उकळ्या फुटत होत्या, जे होतंय ते चांगलं होतंय असं वाटतं त्यांना वाटत होतं असं म्हणत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. यावेळी त्यांनी ए.. तू गप्प, ए... तू शांत बस, ए... तो माईक हातातन घे... हे सर्व पवार साहेबांनी पाहिलं, तर त्यांना वाटलं असेल की मी आत्ताच राजीनामा दिला तर हे असं वागतंय, उद्या मलाही म्हणेल, असेही राज ठाकरे म्हणाले.

बारसू रिफायनरीला राज ठाकरेंचा विरोध

यावेळी राज ठाकरेंनी बारसू रिफायनरीला विरोध केला. जमीन गेली की तुमचं अस्तित्व संपलं. कोणताही इतिहास हा भूगोलाशिवाय नाही असे म्हणत जमीनी विकू नका असे आवाहन राज ठाकरेंनी कोकणवासियांना केले. ते म्हणाले, तुमच्या पायाखालची जमीन जाऊ देताय तर मग ती कुणासाठी जमीन सोडताय याचं भाण ठेवा, असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, तुमच्या पायाखालून शंभर-शंभर, हजार-हजार एकर जमीन निघून जातेय, तुम्हाला समजत नाहीये का? आधी तुमच्याकडून कवडीमोल भावाने जमीन घेतली जाते, नतंर ते सरकारकडून पन्नासपट जास्त किंमत घेतात. नाणार, बारसूमध्ये हे प्रकल्प होणार ऐकल्यावर माझा संताप झाला.

ज्या गोष्टी कोकणात आहे त्यावर केरळसारखं एक अख्ख राज्य चाललंय, केवळ पर्यटनावर केरळसारखं राज्य चाललंय. कोकणातल्या निसर्गाची आपल्याला किंमत नाही. सगळं तुमच्या हातून निसटल्यावर डोक्याला हात मारावा लागेल. कोण जमीन घेतंय, काय होतंय हे आपल्याला कळत नाही, कारण आम्ही बेसाध आहोत, असे राज ठाकरे म्हणाले.

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष, उद्धव ठाकरेंना टोला

यावेळी सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. आत्ता सांगताहेत जी लोकांची भावना ती आमची भावना आहे. मग तुम्हाला हवा होता म्हणून बाळासाहेबांच्या नावावर मुंबईचा माहापौर बंगला ढापला, तो लोकांना विचारून ढापला का? हे सगळं जण तुम्हाला फसवताहेत, मुर्ख बनवताहेत, सावध राहा. कधी हे या प्रदेशाची धुळधाण करतील कळणार नाही. या सगळ्यांतून माझा कोकण वाचवा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonal Chauhan: सौंदर्यवती सोनल; साडीतील फोटोंनी घातली भुरळ

South Africa Squad: T20 WC 2024 साठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा! IPL गाजवणाऱ्या या खेळाडूंना मिळालं स्थान

Nagpur Constituency : 2 लाख मतदार वंचित, अधिकाऱ्यांची बेफिकिरी; नागपूर भाजप शहराध्यक्षांच्या दाव्यानं अधिकारीच गोत्यात!

Today's Marathi News Live : निवडणूक लढवण्यावर शांतीगिरी महाराज ठाम, गिरीश महाजनांसोबतची चर्चा निष्फळ

Hindu Religion: लग्नसंमारभात कोणत्या बोटाने टिळा लावावा?

SCROLL FOR NEXT