Raj Thackeray Karjat speech Live Update : महिना दीड हजार रुपयांनी काय होणार? या दीड हजार रुपयांमध्ये महिलांना विकत घेतले जात आहे आणि त्यांचे तोंड बंद केले जात आहे, जेणेकरून सरकारकडून घातला जाणारा हैदोस जनतेने मुकट गिळून सहन करावा, अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली. ते कर्जतमध्ये बोलत होते. राज ठाकरे यांनी यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. निवडणुकांच्या तोंडावर जाती-धर्माच्या नावावर मते मागितली जातात आणि 'लाडकी बहीण' योजनेवरून महिलांना पैसे देऊन त्यांचे तोंड बंद केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या लोकांच्या हातात काहीच उरलेले नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, केंद्राने आणि एका खाजगी कंपनीने प्रकल्पाबाबत ठरवले आणि तो प्रस्ताव त्यांना दिला. उद्योगपती थेट दिल्लीला जाऊन मोदी आणि शहांना भेटतात आणि प्रकल्पासाठी हवी असलेली जमीन किंवा जंगलांची माहिती देऊन मंजुरी घेतात, असा दावा राज ठाकरेंनी केला. निवडणुकीच्या तोंडावर पैसे घेऊन किंवा जाती-धर्माच्या नावावर मतदान करायचे आणि नंतर पाच वर्षे रडत बसायचे, याला जनता स्वतःच जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले.
कर्जतच्या जंगलात पाहणी आणि संताप:
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, तिथे झाडं कापून रचून ठेवण्यात आली आहेत. हे पाहून मला असे वाटले की मी एखाद्या जंगलाच्या अंत्यसंस्कारालाच आलो आहे. कोणत्यातरी गुजरात्यासाठी ही झाडं तोडून टाकण्याची काय गरज आहे? असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच, राज्यात सत्तेत असलेल्या लोकांची केंद्रासमोर काहीच किंमत नाही, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
'लाडकी बहीण' योजनेवरून घणाघात:
निवडणुकीच्या तोंडावर जाती-धर्माच्या नावावर किंवा पैसे देऊन मते विकत घेतली जात असल्याचे सांगत त्यांनी 'लाडकी बहीण' योजनेवरही टीका केली. महिना दीड हजार रुपयांत महिलांना विकत घेतले जात असून, याद्वारे त्यांची तोंडं बंद केली जात आहेत, जेणेकरून सरकारकडून घातला जाणारा हैदोस जनतेने मुमका गिळून सहन करावा, असा आरोप ठाकरेंनी केला.
केंद्र सरकार आणि उद्योगांवर गंभीर आरोप:
हा प्रकल्प केंद्र सरकार आणि एका खासगी कंपनीने मिळून ठरवला असल्याचा दावा करत, उद्योगपती थेट दिल्लीत जाऊन मोदी-शहांना भेटतात आणि झाडं तोडण्याची परवानगी मागतात, असे राज ठाकरे म्हणाले. असा शांत राहणारा महाराष्ट्र दोन गुजराती चालवणार आणि तेच सर्वकाही ठरवणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जव्हार-मोखाड्याच्या जनतेला सावधतेचा इशारा:
हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हे सांगताना त्यांनी जव्हार आणि मोखाड्याच्या लोकांना सावध केले. "आज कर्जतच्या जंगलावर कुऱ्हाड चालवली जात आहे, उद्या तुमच्या दारावर टकटक होईल," असे म्हणत त्यांनी नागरिकांना या प्रकल्पांविरोधात सजग राहण्याचे आवाहन केले. या प्रकल्पासाठी कोणतेही टेंडर काढण्यात आले नसून सह्याद्रीच्या कुशीत असे तब्ब २३ प्रकल्प येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.