बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर 13 वर्षांनी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची साद घातलीय. मात्र एकत्र येण्याआधी उद्धव ठाकरेंनी अटी-शर्ती ठेवल्या आहेत? त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही युती होणार की अटी शर्तींमध्ये रखडणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्ट.
ऐकलंत... शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरेंनी ज्येष्ठ सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीतून बंधू उद्धव ठाकरेंना साद घातलीय. महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं आणि मतभेद विसरण्यास तयार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. तर थेट उद्धव ठाकरेंनी वाद मिटल्याचं जाहीर करत राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिलाय.
खरंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. ठाकरे कुटुंबाचे दोन वारसदार. मात्र हे दोन वेगवेगळ्या सेनांचे सेनापती. 2006 मध्येच दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. दरम्यान दोन्ही ठाकरेंनी एकमेकांवर टीकेचे कडवे बाण सोडले. तेव्हापासून आजपर्यंत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा वारंवार रंगल्या. कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीही केली.. मात्र एकी काही झाली नाही.
मात्र आता दोन्ही सेनापतींनी किरकोळ भांडणं बाजूला ठेवण्याची तयारी दाखवत एकमेकांना साद घातलीय. मात्र एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी ठेवल्या आहेत. ठाकरे बंधूंनी एकमेकांना टाळी देण्याच्या निर्णयामागचे राजकीय अर्थ नेमके काय आहेत? यासंदर्भात सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याकडून जाणून घेतलंय.
ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याची राजकीय समीकरणं बदलणार एवढं नक्की. मात्र याचा फटका इतर प्रादेशिक पक्षांना अधिक बसणार की राष्ट्रीय पक्षांना याची चर्चा रंगू लागलीय. असं असलं तरी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी अटी आणि शर्ती पुढे केल्या आहेत. त्यामुळे ठाकरे बंधु खरंच एकत्र येणार की अटींमुळे पुन्हा युती रखडणार याबाबत आता साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.