Raj Thackeray Saam Tv news
महाराष्ट्र

राज्यात आलेले उद्योग बाहेर कसे जातात? फॉक्सकॉन प्रकल्पावर राज ठाकरेंचा सवाल

फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी; राज ठाकरेंची मागणी

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

MNS Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते नागपुरात (Nagpur) असून यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर आपले मत मांडले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वेदांता-फॉक्सकॉन वादावरून मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. (Raj Thackeray News)

राज्यात आलेला उद्योग बाहेर जातोच कसा? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. फॉक्सकॉन प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच नेमकं कुठं फिस्कटलं हे सत्य बाहेर येण्यासाठी या सर्व प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. या प्रकरणात पैशांची मागणी केली गेली आहे का? याचीही चौकशी व्हावी अशी मागणी राज ठाकरे यांनी यावेळी केली.

मनसे-भाजप युती होणार?

मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपची युती होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना विचारला. यावर उत्तर देताना, आमचं युतीबाबत काही बोलणं झालं नाहीत. युतीबाबतच्या बातम्या मी तुमच्याकडूनच ऐकतो आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT