Raj Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: अंगावर आले तर शिंगावर घ्या; राज ठाकरेंचा मनसे कार्यकर्त्यांना सल्ला

जसे समोरचे वागतील, तसंच आपण पण वागायचं. त्यांनी हात उचलला तर आपणही हातच उचलला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटल.

साम टिव्ही ब्युरो

>> जितेश कोळी

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहे. तेथे ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी खेड येथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घ्यायची तयारी ठेवा, असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. (Maharashtra Politics News)

जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घ्यायची तयारी ठेवा. तुमच्यासाठी वकिलांची फौज तयार ठेवेन, असे आश्वासन राज ठाकरे यांनी खेड येथे मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले. जसे समोरचे वागतील, तसंच आपण पण वागायचं. त्यांनी हात उचलला तर आपणही हातच उचलला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

लवकरच कोकणात मनसे पक्ष बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. येत्या जानेवारी महिन्यात चिपळूण येथे माझी जाहीर सभा होईल, असं देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

गायब वैभव खेडेकर आज दिसले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात गायब असणारे मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर आज मात्र दौऱ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. खेड शहरातील द. ग. तटकरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मनसे पदाधिकारी, कार्यकर्ता संवाद मेळाव्यात वैभव खेडेकर यांनी राज ठाकरे यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यामुळे नाराजीच्या सुरू असलेल्या चर्चाना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut ladoo Recipe : फक्त ३ पदार्थ वापरा अन् झटपट बनवा शेंगदाण्याचे लाडू, उपवासाला हेल्दी स्नॅक्स

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT