"मराठ्यांना आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा, माथी भडकवू नका" Saamtv
महाराष्ट्र

"मराठ्यांना आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा, माथी भडकवू नका"

आज पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक मते मांडली. यावेळी बोलताना त्यांचा रोख मुख्यत्वे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जातीय राजकारण होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक मते मांडली. यावेळी बोलताना त्यांचा रोख मुख्यत्वे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जातीय राजकारण होता. राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, जात ही गोष्ट आपल्याकडे अनेक काळापासून आहे. मात्र, १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि तिथूनच महाराष्ट्रात जातीयवादी राजकारणाला ऊत आला.


हे देखील पहा -

शरद पवार यांनी राज ठाकरेंना प्रबोधनकर ठाकरे वाचावेत या दिलेल्या सल्ल्यावर राज म्हणाले, मुळात शरद पवार यांनी मला माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे वाचावेत असे का म्हटले आहे हे समजत नाही. मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाण देखील वाचलेत त्यामुळे माझ्या भूमिका काय असाव्यात हे कोणी ठरवू नये.

यावेळी ऑलम्पिकवीर नीरज चोप्रा त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन व मराठा असल्याबाबतच्या समाजमाध्यमांवर रंगलेल्या चर्चांवर बोलताना राज म्हणाले, "ऑलंपिक मध्ये जिंकल्यानंतरच नीरज चोप्रा सगळ्यांना माहित झाला त्याच्या आधी त्याची जात नाही विचारली कोणी हे असंच असतं, महाराष्ट्रातील मराठा समाज मोर्चे काढतोय आंदोलने करतोय, पण हे सगळं होत असताना जर आरक्षण मिळणारच नसेल तर त्यांना स्पष्ट सांगण्यात यावं केवळ राजकारणासाठी हे सर्व सुरु ठेवून आणि मतांवर डोळा ठेवून जर हे सुरु असेल तर त्याचा एखाद्या निवडणुकीत फायदा होईल पण पुढे काय"असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राच्या राजकारणातून जातीपातीचा मुद्दा हद्दपार होणे गरजेचे आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षांच्या कालावधीपासून मित्रामित्रांमध्ये आणि शाळा-कॉलेजेसमध्येही जातीपातीचे विचार आले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख पुन्हा राष्ट्रवादीकडेच असल्याचे दिसून येते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

सासरच्या छळाला कंटाळली! महिला पोलीस कॉन्स्टेबलनं आयुष्य संपवलं; VIDEOतून केला खुलासा

Maharashtra Rain Live News: तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला

Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

Mumbai News: मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, भीतीपोटी पोलीस अधिकाऱ्यानं सरकारी घर सोडलं

SCROLL FOR NEXT