Raj Thackeray Raj Thackeray
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Latest News Update : राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनावर मोठं वक्तव्य करताना राज्य सरकारवर टीका केली.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray On Ladki Bahin Yojana : आताच्या सरकारने महिलांसाठी योजना आणल्यात. पण राज्यावर बोजा न होता जर या गोष्टी यशस्वी झाल्या तर गिफ्टच म्हणेल; नाहीतर ही एकप्रकारची लाच असेल. महिलांना पैसे मिळतात याचा आनंद आहे. पण पुढे खड्डे खाणतोय का? हे पाहणेही तितकेच महत्त्वाचं आहे, असा सावध इशारा राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर दिला.

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचा आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर त्यांनी टीकास्त्र सोडले. राज ठाकरेंनी यावेळी लाडक्या बहीण योजनेबाबात महत्वाचं वक्तव्य केले. ही योजना चांगली आहे, पण आपण खड्डा खाणतोय का? याचा बोजा आपल्यावर नाही आला म्हणजे मिळवलं. नाहीतर याला मी लाच म्हणेण, असे मत ठाकरेंनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्य देशात नाही. जगात कुठूनही उद्योग आला तरी आधी महाराष्ट्रात येतो. राज्यातील उद्योग हे स्थानिकांना कळायला हवेत. मुळात हे सरकारला विचारायला हवे. राज्य सरकारला मिळणार नफा आपण बिल्डरच्या घशात का घालतोय? धारावी पुनर्विकास बाबत पुनर्विचार करणार असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. त्याशिवाय मुळात झोपडपट्टी उभ्या रहातात कश्या? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

तुम्ही ज्याला मत दिलेय, तो सध्या कुठे आहे, ते पाहा

प्रत्येक पक्षाने माझ्यापेक्षा कमी उमेदवार उभे केलेत.

महिलांना चार पैसे मिळत आहे यात आनंद आहे.. पण वेगळे खड्डे नाही खणत आहोत.

महाराजांची मंदिरे उभी करण्यापेक्षा विद्यामंदिर उभी करणे गरजेचे आहे. चौक चौकात पुतळे आहेत.

१७ तारखेला राजकारण आहे की नाही हे माहीत नाही.. पण परवानगी नाही मिळाले आहे.. आणि कमी वेळेत सगळं करणे शक्य नाही. त्यामुळे सांगता सभा रद्द करण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत.

त्यात एक दिवस मिळाले आहे.. उमेदवार पण व्यस्त राहणार नाही

जाहीरनामा प्रकाशित केला नसता तर तुम्हीच ठोकलं असता.

माझ्या मनात महाराष्ट्र आहे, त्यात विकास येणारच.

महाराष्ट्राच्या राजकारणात अशी निवडणूक कधी झाली नाही.

एक खासदार १ मताने निवडून आला. मग फेरमतदान घेतलं, त्यामध्ये ४९ मतांनी जिंकला. असे कधीही झालं नाही...

जो पक्ष आवडणार नाही त्याला मतदान दिले नाही.

राज्यात जी घुसखोरी होत आहे. त्याबाबत कारवाई व्हायला हवी.

जमिनीबाबत राज्य सरकारने विचार करायला हवा, अनधिकृत बांधकामे का होत आहेत.

मी भोंगे आंदोलन केलं, तेव्हा मला जर राज्य सरकार ने साथ दिली असती तर तेव्हाच बंद झाले असते. त्यावेळी त्यांनी साथ दिली नाही. आता परत जोरजोरात वाजू लागले. उत्तर प्रदेशमध्ये भोंगे बंद झाले मग महाराष्ट्रात का नाही? उत्सवाच्या दिवशी लाऊड स्पीकर समजू शकतो . पण ३६५ दिवस २४ तास ही कोणती पद्धत झाली. आपण घरात नमस्कार करतो. मग हे नमाज पडायला का रस्त्यावर येतात. हे पाया पडायला नाही तर शक्ती दाखवायला येतात.

पाकिस्तानी कलाकार विषय नाही तर ते आपल्या कलाकारांना कसे वागवतात, हा विषय आहे. BCCI ने पाकिस्तानात खेळाडू बाबत निर्णय घेतला तो योग्य आहे.

माझ्या बॅग २ वेळा चेक करण्यात आल्या. त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. ज्याच्या हातातून पैसे सुटत नसतील त्याच्या बॅगमध्ये कसे पैसे असतील?

इथे राजकारणी सोडून सगळ्यांना स्वप्न पडतात. हडपसरला ट्रॅफिक समस्येबाबत काही बोलणे नाही. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत जगातील मोठं वाचनालय असावे हे माझे स्वप्न आहे.

संघाबद्दल बंदी आणणे योग्य नाही. १९२५ साली RSS स्थापना झाली. मग जनसंघ म्हणजे राजकारणात आले. मग त्यानंतर भारतीय जनता पक्ष झाला. १९५२ ते २०१४ इतका प्रवास झाला.जेव्हा त्यांना बहुमत आलं.

मी विधानसभा एकला चलो रे..अशी लढवत आहे. मी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला, त्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीची तयारी करा असे म्हटलेले. महायुतीमध्ये आधीच ३ पार्टनर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT