Raj Thackeray, Ajit Pawar, international cartoonist festival, pune saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar यांना चिमटा... व्यंगचित्र पुर्ण हाेताच Raj Thackeray म्हणाले, पुढं काय लिहू गप्प बसा (पाहा व्हिडिओ)

राज ठाकरे व्यंगचित्र काढत असताना ते शरद पवार साहेब काढताहेत की काय अशी कुजबूज सुरु झाली.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Raj Thackeray News : जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त आज (शुक्रवार) पुण्यात आयाेजिलेल्या व्यंगचित्र महोत्सवाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राज ठाकरे यांनी व्यंगचित्रांची पाहणी करुन चित्रकरांचे काैतुक केले. यावेळी उपस्थितांनी ठाकरेंना व्यंगचित्र काढण्याचा आग्रह केला. त्यानंतर ठाकरेंनी पेन्सिल हाती घेतली. यावेळी राज ठाकरे काय व्यंगचित्र काढणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली. (Breaking Marathi News)

राज ठाकरे व्यंगचित्र काढत असताना अनेक जण ते नेमकं काय काढत आहेत याचा अंदाज बांधत हाेते. काेणी म्हणत हाेते शरद पवार साहेब काढताहेत तर काेणी अन्य नेत्याचे नाव घेत हाेते. सातत्याने अनेक जण ते काढताहेत यासाठी डाेकावत हाेते.

राज यांनी अवघ्या काही सेकंदात एक व्यंगचित्र काढले. त्यानंतर त्यांनी पेन्सिल देत असतानाच एकाने काही तरी लिहा असे म्हणताच त्यांनी पुढे काय लिहू गप्प बसा असे म्हणताच एकच हशा पिकला.

यावेळी राज ठाकरे म्हणाले खूप काही दिवसांपासून सवय माेडली आहे. सगळ्यांसमोर व्यंगचित्र काढण्याची सवय नाही. आज जजमेंट आलं नाही. जे आहे ते गोड माना असेही ठाकरेंनी नमूद केले.

दरम्यान राज ठाकरे यांना राज्याचे विराेधी पक्ष नेते अजित पवार यांचे चित्र काढायचे हाेते असा सूर समाज माध्यमातून उमटला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT