raj thackeray devendra fadnavis x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : फडणवीसांच्या भेटीचं 'राज'कारण? राज ठाकरे महायुतीत जाणार?

Maharashtra Political News : महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीच्या चर्चा रंगल्या होत्या... मात्र एकीकडे युतीची चर्चा सुरु असतानाच फडणवीस आणि राज ठाकरेंची बैठक झालीय...या भेटीमुळे युतीच्या चर्चांना ब्रेक लागणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

जे महाराष्ट्राच्या मनात तेच होईल, असं म्हणून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत स्पष्ट संकेत दिले... मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु असतानाच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंशी तब्बल तासभर बंद दाराआड चर्चा करुन खळबळ उडवून दिलीय..तर फडणवीस आणि राज ठाकरेंमधील भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रीया भाजपने दिलीय..

दुसरीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे गटाने युतीसाठी आशादायी असल्याचे संकेत दिलेत.. तर शिंदे गटाने राज ठाकरेंना महायुतीत सहभागी होण्याची ऑफरच दिलीय... तर विरोधकांनी मात्र या भेटीमुळे राज ठाकरेंची विश्वासार्हता कमी होण्याची शक्यता वर्तवलीय...

2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीही देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये भेटीगाठी वाढल्या होत्या... त्यानंतर राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूकीत भाजपला बिनशर्त पाठींबा दिला...मात्र आता फडणवीसांच्या भेटीनंतरही ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येणार की पुन्हा युतीच्या चर्चा बारगळणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दररोज २०० रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

Face Acne : पिंपल्स होतील गायब, चेहऱ्यावर लावा 'हा' फेसमास्क

Maharashtra Politics : निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचा भडका! शिंदे सेना-भाजप आमनेसामने

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT