Raj Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Raj Thackeray : ‘शिवतिर्था’वर दोन नवे सदस्य दाखल, राज ठाकरे यांची नवी लकी कार कोणती?

नवीन कारसाठी राज ठाकरे यांनी आपल्या लकी नंबरचीच निवड केली आहे.

Ruchika Jadhav

Raj Thackeray New Car : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दोन कारचे आगमन झाले आहे. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच सफेद रंगाच्या कारला पसंती दिली आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या कार होत्या. मात्र यावेळी त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासाठी आणि स्वत:साठी दोन कार खरेदी केल्या आहेत.नवीन कारसाठी राज ठाकरे यांनी आपल्या लकी नंबरचीच निवड केली आहे. (Latest Raj Thackeray New Car News)

काय आहे तो लकी नंबर?

राज ठाकरे यांनी १५ दिवसांआधीच एक कार खरेदी केली आहे. ही कार त्यांनी शर्मिला ठाकरे यांच्यासाठी खरेदी केली. तसेच काल त्यांनी स्वत:साठी एक कार खरेदी केली. आलिशान चकचकीत सफेद रंगाच्या या कारचा क्रमांक ९ आहे. राज ठाकरे यांचा हा लकी क्रमांक आहे. त्यांच्याकडे या आधी ज्या कार आहेत त्यांचा क्रमांक देखील ९ आहे. त्यामुळे यावेळी देखील त्यांनी याच लकी क्रमांकाची निवड केली आहे.

त्या दोन कार कोणत्या आहेत?

शिवतीर्थावर आगमन झालेली पहिली कार म्हणजे राज यांनी त्यांच्या पत्नीसाठी खरेदी केलेली कार टोयोटा वेल्फायर ही आहे. तर काल त्यांनी जी कार खरेदी केली आहे ती लँड क्रूझर आहे.

राज ठाकरे यांच्या ताफ्यात कोणत्या कार आहेत?

मर्सिडीज या कंपनीची सेडान ही कार या आधी राज ठाकरे यांनी खरेदी केली आहे. त्यांच्या प्रवासासाठी ते नेहमी याच कारने प्रवास करतात. ही कार कधीकधी ते स्वत: देखील चालवतात. महाराष्ट्रातील अन्य काही नेत्यांकडे देखील ही कार आहे. या कारसह त्यांच्याकडे क्रुझर एसयुव्ही ही कार देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणी काय खावं हे सरकारनं सांगू नये; मांसबंदीवर राज ठाकरेंचा हल्लाबोल|VIDEO

RBI Rules: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! चेक क्लिअरन्सच्या नियमांत केला बदल

General Knowledge: व्यक्तीच्या शिंकण्याचा वेग किती असतो?

Maharashtra Live News Update: पुण्यात भाजप आमदार, महापालिका आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांचा रिक्षाने एकत्रित प्रवास

Ajit Pawar: महायुती सरकार धारावी पुनर्विकास करूनच दाखवणार- अजित पवार|VIDEO

SCROLL FOR NEXT