Raj kundra Pornography Case : राम कदमांचा मोठा खुलासा saan tv news
महाराष्ट्र

Raj kundra Pornography Case : राम कदमांचा मोठा खुलासा

याप्रकरणी दररोज काहीना काही नवे खुलासे समोर येत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या आठवड्यात उद्योजक राज कुंद्राचे पॉर्नोग्राफी प्रकरण (Raj kundra Pornography Case) समोर आल्यानंतर सिनेसृष्टीसह (Bollywood) राज्यातही याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याप्रकरणी दररोज काहीना काही नवे खुलासे समोर येत आहेत. आता याप्रकरणी भाजपा नेते राम कदम (BJP leader Ram Kadam) यांनी मोठा खुलासा केला आहे. (Raj kundra Pornography Case: Big revelation of Ram Kadam)

महाराष्ट्रात फसवणूक अनेक तरुणांची झाली. त्याबाबत काही महत्वाचा खुलासा करायचा आहे. राज कुंद्राने विआन इंडस्ट्री नावाने जिओडी नावाने ऑनलाइन गेम लॉन्च केला. हा गेम पूर्णपणे कायद्याच्या मान्यताने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. ऑनलाइन गेम आहे ज्यात शिल्पा शेट्टी चा नाव आणि फोटो वापरला. गेममध्ये चेंडू कुठे जाणार हे सांगणाऱ्सांना पैसे मिळणार असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी त्याने आपल्या पत्नीचा चेहरा त्यांनी सगळीकडे वापरला.

प्रत्येकाला व्यापार करायचं अधिकार आहे, पण कोणाला धोका देण्याचा अधिकार नाही. या गेमसाठी त्याने कोणाकडून 30 लाख, 15 लाख, 20 लाख घेतले. अशा प्रकारे राज कुंद्राने जवळपास अडीच हजार ते तीन हजार कोटींचा गफला केला आहे. जे कोणी पैसे मागायला गेले त्यांना मारहाण केली. जिओडी गेमचे पैसे बक्षिसे ही त्यांच्याच कर्मचाऱ्यांना मिळाली.

महाराष्ट्रात हे झालं आहे. मराठी लोकांना राज कुंद्राच्या कंपनीने फसवलं तेव्हा महाराष्ट्र सरकार काय करत होत? असा सवालही राम कदम यांनी विचारला आहे. पैसे परत मागणाऱ्यांना मारहाण झाली. याची तक्रारी केल्यावरही न्याय दिला नाही, त्यावेळी पोलीस कोणत्या दबावात होते ? त्यांची नावे पुढे आली पाहिजेत. असेही राम कदम यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात इतकी मोठी फसवणूक तर इतर राज्यात कशी फसवणूक केली असेल? मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारने लक्षात घ्यावे की प्रकरण खूप मोठं आहे, लोकांना फसवलं आहे त्याचा तपास करून तथ्य समोर आणा आणि आरोपींना तुरुंगात टाका. 3 दिवसात न्याय नाही मिळाला नाही तर सोमवारी पोलीस कमिशनर, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

जुहू पोलीस ठाण्यात अभिनेत्री तक्रार देते. ती कमिशनर आणि पंतप्रधान यांच्याकडे न्याय मिळण्याबाबत मागणी करते. तिच शारीरिक शोषण केलं, राज कुंद्राने हे केलं, अशी तक्रार करूनही ते अप्लिकेशन पुढे गेलं नाही. असं नक्की का केलं, या सर्वांचे उत्तर मिळाले पाहिजे, असेही राम कदम यांनी स्पष्ट केले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT