Monsoon in Maharashtra: मान्सूनच्या पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम होत आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरीपर्यंत पोहचलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) पुढील चाल मंदावली आहे. १८ ते २१ जूनदरम्यान त्याला पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. (Latest Marathi News)
दरवर्षीच्या तुलनेत यंदा मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले. देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये मॉन्सून तब्बल ७ दिवस उशीराने दाखल झाला. त्यानंतर १० जून मॉन्सूनने केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीवर मॉन्सूनने (Monsoon) धडक दिली.
त्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनने ११ जूनला धडक दिली. कोकणातील रत्नागिरीपर्यंत पोहचलेला मान्सून लवकरच संपूर्ण राज्याला व्यापून टाकेल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात अद्याप फार प्रगती झालेली नाही.
चक्रीवादळाने आर्द्रता खेचून घेतल्याने सध्या राज्यात फारसा पाऊस (Rain Alert) नाही. त्यामुळे मान्सूनच्या पुढच्या प्रवासासाठी १८ जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असंही हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
शेतकऱ्यांनी पावसाच्या या स्थितीवर अवलंबून पेरणीपूर्वीची शेतीची मशागत कामे करावीत, असंही तज्ञ्जांनी सांगितलं आहे. दरम्यान, मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारताच्या आणखी काही भागांत १८ ते २१ जून दरम्यान मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, मान्सून पूर्णपणे महाराष्ट्रात दाखल झाला नसला तरी, सध्या मुंबईसह (Mumbai Rain) उपनगरात अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व पावसाचे संकेत आहेत. उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपर्यंत सर्वदूर पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.