Maharashtra weather update  saam tv
महाराष्ट्र

Weather Updates : राज्यासाठी पुढील ४८ तास धोक्याचे; 'या' जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा

पुढील दोन ते तीन हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून (Weather Updates) सांगण्यात आलंय.

साम टिव्ही ब्युरो

Rain News Today : काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Rain) विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने परतीचा मार्ग धरला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे जलमय परिस्थिती निर्माण झाली असून नदी-नाल्यांना पूर आलाय. (Rain News In Maharashtra Today Marathi)

दरम्यान, पुढील दोन ते तीन हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचं हवामान विभागाकडून (Weather Updates) सांगण्यात आलंय. इतकंच नाही तर, राज्यासाठी पुढील ४८ तास धोक्याचे असल्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगर आणि आजूबाजूच्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra News)

आज म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी मुंबईत हवामान विभागाने यलो अलर्ट देखील जारी केला आहे. याशिवाय ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वरतवण्यात आली आहे.

राज्यात कुठे-कुठे होणार पाऊस?

हवामान खात्याच्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked raisins: 30 दिवस रोज सकाळी खा पाण्यात भिजवलेले मनुके; होणारे फायदे वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Maharashtra News Live Update: १८,६०० फूट उंचीवर भारतीय लष्कराच्या वैमानिकांचा थरारक पराक्रम; एकाच स्किडवर लँडिंग करत जखमीची केली सुटका

टिटवाळा स्थानकात १५ दिवसांचा मोठा मेगाब्लॉक! १५ दिवस लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार; अनेक गाड्या रद्द

Bank Holidays 2026: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँकांना सुट्ट्या, वाचा संपूर्ण यादी

Weekend Getaway : मुंबईकरांनो, पावसाळ्यात One Day Trip साठी हे ठिकाण आहे एकदम परफेक्ट!

SCROLL FOR NEXT