ratnagiri, sindhudurg, konkan railway, rain saam tv
महाराष्ट्र

पावसामुळं कोकण रेल्वेचं वेळापत्रक काेलमडलं; रुळावर दगड, मातीचा ढिगारा; आंबाेलीत एसपी दाखल

आज सकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे.

अमोल कलये

रत्नागिरी / सिंधुदुर्ग : काेकणात (kokan) गेले दाेन दिवस झाले पावसाचा (rain) जाेर वाढला आहे. यामुळे घाट रस्त्यांवर दरड (landslide) काेसळण्याच्या घटना घडत आहे. यामुळे वाहतुक खाेळंबत आहे. दरम्यान पावसाचा फटका काेकण रेल्वे (Konkan Railway) प्रशासनास देखील आज (गुरुवार) बसला आहे. (Konkan Railway Latest Marathi News)

अंजणी आणि चिपळूण दरम्यान रेल्वे मार्गावर माती आणि दगड आले. त्यामुळे मुंबई मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबविण्यात आली. मांडवी एक्सप्रेस ही रत्नागिरीत येणार हाेती. परंतु सध्या तरी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबविण्यात आली आहे. या बराेबरच इतरही रेल्वे गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या आहेत. मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन काढून मदत कार्यासाठी नेण्यात आले आहे. (Konkan Railway News)

- विनायक वंजारे (साम टिव्ही प्रतिनिधी)

आंबोलीत एसपी दाखल

सिंधुदुर्ग : आंबोली येथील धबधब्यावर (amboli waterfall) वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये व पर्यटकांना कोणतीही समस्या जाणवू नये यासाठी सुट्टीच्या दिवशी अधिकचा बंदोबस्त ठेवण्याबरोबर वाहतूकीत सुसूत्रता आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे (SP Rajendra Dabhade) यांनी पाेलीस दलास दिल्या आहेत.

आंबोली धबधब्याच्या ठिकाणी रविवार काही पर्यटकांनी रस्त्यात वाहन उभी करुन हुल्लडबाजी केली होती. त्यामुळे आंबोली घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याबराेबरच बेळगाव वरून आलेल्या पर्यटकांकडून एसटी चालकाला देखील मारहाण करण्याची घटना नुकतीच घडली होती. या दाेन्ही घटनांची दखल घेऊन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आंबोलीत दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच अतिउत्साही आणि कायद्याचे पालन न करणा-या पर्यटकांवर कारवाई करण्याचा सुचना अधिका-यांना दिल्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांच्या नातीचा लग्नातला रॉयल लूक, भरजरी लेहेंग्यात सजली नवरी; पाहा Unseen Photos

Accident News : बर्थडेच्या दिवशीच काळाचा घाला; भरधाव कार अपघातात फुटबॉलपटू आणि तरुणीचा मृत्यू

Pune News: पुणेकरांसाठी गुड न्यूज! रेल्वे रुळाखाली 'अंडरपास' अन् वर 'फ्लायओव्हर'; असा सुटणार वाहतुकीचा वेढा

Maharashtra News Live Update : सहा बंडखोर खासदार मुंबईत दाखल

Child swallowed magnet: धक्कादायक घटना! खेळता खेळता सात वर्षांच्या मुलीने गिळला चुंबक, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

SCROLL FOR NEXT