औरंगाबाद, नाशिकसह महाराष्ट्राला पावसाने झोडपलं Saam tv
महाराष्ट्र

औरंगाबाद, नाशिकसह महाराष्ट्राला पावसाने झोडपलं

नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे अद्याप पूर्ण झाली नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर गायकवाड,डॉ. माधव सावरगावे, लक्ष्मण सोळुंके

औरंगाबाद - जिल्ह्यात आज पुन्हा पावसाने Rain जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद Aurangabad जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव फुलंब्री Phulambri या भागात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर आजही औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झालेली आहे. या महिन्यातील पहिल्याच आठवड्यात औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास १०० हून अधिक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. पुन्हा मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोरडवाहू पिकांना मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांशी भागात कापूस मका बाजरी, सोयाबीन, तूर ही पिके घेतली जातात, त्यांना मोठा फटका बसलाय. दुसरीकडे तीन आठवडे झाले तरी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे अद्याप पूर्ण झाली नाहीत.

हे देखील पहा -

तर, दुसरीकडे नाशिकच्या गोदावरीला आला पूर आला आहे. पूराच्या पाण्यामुळे मंदीर पाण्या खाली गेले आहे. गेल्या रात्र भरापासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस येत असल्याने गोदावरी धरणारतून सकाळी 9 वाजता 1100 तर दुपारी 12 ला चार हजार क्यूसेसने तर 1 वाजेला सहा हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात आले. पाणी वाढणार असल्याने नदी काटच्या नागरिकांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर जालन्यात सुद्धा सलग तिसऱ्या दिवशी देखील मुसळधार पावसाला सुरवात झाली. मुसळधार पावसाने खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT