Maharashtra Rain News Latest Updates Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast : आभाळ गडगडलं, ढग आले दाटून; आजपासून या भागांत अतिमुसळधार पाऊस, IMD कडून अलर्ट

Maharashtra Rain News Latest Updates : महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून येत्या १० जुलैपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Satish Daud

महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून येत्या १० जुलैपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातही जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील ५ दिवस कोकणातील अनेक जिल्हे आणि मुंबईसह उपनगराला पावसाचा ऑरेंज (Rain Orange Alert) अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

सध्या दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी (Maharashtra Rain Updates) पोषण वातावरण तयार झालं आहे. येत्या ५ दिवसांत कोकण, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा (IMD Weather Alert) अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे पेरणी करून बसलेले शेतकरी चिंतेत सापडले होते. रविवारी दोन्ही विभागात जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू होता.

दरम्यान, पावसाचा हा जोर असाच कायम राहणार असून पुढील ५ दिवस धुव्वाधार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी ऑरेंज तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.

पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा (Mumbai Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात पुढील २ दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात १० जुलैला काही ठिकाणी तर ७ ते ९ जुलै दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Metro 4: मुहूर्त ठरला! कॅडबरी जंक्शन ते गायमुखपर्यंतची ठाणे मेट्रो 4 या दिवशी होणार सुरु; कोणत्या स्थानकावर थांबणार?

Zodiac predictions : आज घेतलेला एक निर्णय बदलू शकतो भविष्य! वाचा १८ डिसेंबरचं सविस्तर पंचांग

Maharashtra Live News Update: रत्नागिरीत बिबट्याची दहशत ,एका रात्रीत चार गुरांना केलं ठार

Mawa Barfi Recipe : फक्त ४ पदार्थांपासून बनवा स्वादिष्ट मावा बर्फी, तोंडात टाकताच विरघळेल

Ram Sutar : शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या काळाच्या पडद्याआड, राम सुतार यांचं निधन

SCROLL FOR NEXT