Rain Alert  Saam Digital
महाराष्ट्र

Rain Alert : राज्यातील या जिल्ह्यांना पुढचे ३ तास अलर्ट; आज पुन्हा विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

IMD rain Alert : हवामान खात्याने आजही राज्यातील काही जिल्ह्यांना पुढचे ३ तास अलर्ट दिला आहे. वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह वळवाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Sandeep Gawade

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील काही जिल्ह्यांना अवाकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं होतं. पुणे शहर तर जलमय झालं होतं. हवामान खात्याने आजही राज्यातील काही जिल्ह्यांना पुढचे ३ तास अलर्ट दिला आहे. वीजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह वळवाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, सोलापूर, छ. संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर, अमरावती, नागपूर या जिल्हांना अलर्ट देण्यात आला आहे.

शुक्रवारी अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं होतं. पुणे, सांगली, अहमदनगर , छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. दरम्यान काल अचानक आलेल्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान देखील झाले आहे. पुण्यातील रस्ते तर जलमय झाले होते.

शनिवारी आणि रविवारी राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढणार, असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या २४ तासांत कोकण किनारपट्टीसह, विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे तीन तास अलर्ट देण्यात आला आहे.

यापार्श्वभूमीवर राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी चंद्रपूर जिल्ह्याला गारपीट होण्याची शक्यता आहे. पुणे, लातूर, नांदेड तसेच सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात देखील अवकाळी पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cockroach Janata Patry: सोशल मीडिया अकाउंट बंद होताच कॉक्रोच जनता पार्टीनं उचललं मोठं पाऊल

Maharashtra News Live Update: सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात २६ मे पासून वाढ

उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड; इंजिनमधून अचानक निघू लागला धूर

Akshay Kumar Troll: अक्षय कुमार बनला भोजपुरी 'आयटम बॉय'; 'घिस घिस घिस' गाण्यामुळे अभिनेत्याला ट्रोलिंग, मीम्स तुफान व्हायरल

Panvel Travel : शहराच्या गोंधळातून घ्या ब्रेक; पनवेलमधील डोंगररांगांनी वेढलेले 'हे' ठिकाण Summer ट्रिपसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT