Rahuri to Shanishinganapur Railway Route saam Tv
महाराष्ट्र

Railway Line: महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे मार्गाला मंजुरी; राज्यातील प्रसिद्ध देवस्थानाला जाणं होणार सोपं

Rahuri to Shanishinganapur Railway Route: आणखी एका नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आलीय. यामुळे देशातील महत्त्वाच्या देवस्थानाला जाणं सोपं होणार आहे.

Bharat Jadhav

राज्यातील आणखी एका रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिलीय. शनिशिंगणापूरला जाण्यासाठी रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आलीय. हा रेल्वे मार्ग राहुरी ते शनिशिंगणापूर दरम्यान असणार आहे. तब्बल 22 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी सुमारे 494 कोटी रुपये खर्च येईल, असं अपेक्षित आहे.

शनिशिंगणापूर धार्मिक ठिकाण असून तेथे भाविकांची रहदारी असते. शनिशिंगणापूर येथे दररोज ४५ ते ५० हजार भाविक येत असतात. राहुरी ते शनिशिंगणापूर दरम्यान रेल्वे मार्ग सुरू झाल्यानं भाविकांची प्रवास सुरळीत होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे राहुरीतील राहू-केतू मंदिर, नेवाशातील मोहिनीराज मंदिर तसेच पैस खांब यांसारख्या अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी रेल्वेने जाता पोहोचता येणार आहे.

या रेल्वे सेवेमुळे या भागातील स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार या मार्गावर दररोज ४ रेल्वेगाड्या धावणार आहे. दरवर्षी सुमारे १८ लाख प्रवासी या मार्गाचा वापर करतील, असा अंदाज व्यक्त मंत्रालयाकडून करण्यात आलाय. तसेच हा रेल्वेमार्ग विकास आणि अध्यात्मिक केंद्रांना जोडणारा दिशादर्शक प्रकल्प असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केलंय.

दरम्यान या योजनेसाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला होता. तसेच केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्न आता यश आले आहे.

भारतीय रेल्वेकडून लवकरच पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आलीय. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय-स्पीड ट्रेन आहे. सुरुवातीला नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर धावली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महत्त्वाच्या मार्गांवरही या गाडीचे संचालन सुरू करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : मोठी बातमी: मुंबईत भाजप आमदाराच्या कारचा भीषण अपघात, फ्री वे वर ३ वाहनांना धडक

Maharashtra News Live Update: रोहित पवारांचा दुष्काळी दौरा; ‘काजू-बदाम खाऊन तरी बुद्धी चालवा’, सरकारवर जोरदार टीका

मोठी बातमी! मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला; 6 जण ढिगाऱ्याखाली अडकले, 2 जणांचा मृत्यू

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT