राजेश भोस्तेकर, रायगड
रायगड: जिल्ह्यात आज पहाटे पारा 14 अंशावर आला असल्याने रायगडकर थंडीने गारठले आहेत. 23 तारखेला आलेल्या धुळीच्या वादळाने आणि पावसाळी वातावरणाने बदल झाल्याने कालपासूनच जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. त्यामुळे रायगडात हुडहुडी भरली आहे. थंडी (Winter) सोबतच गार वारा सुटल्याने वातावरण थंड झाले आहे. त्यामुळे नागरिक गरम, उबदार कपडे घालून आणि शेकोटी (BornFire) पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत. (Raigadkar is taking fireplace for protect themselves from winter)
हे देखील पहा -
आधीच रायगडकर (Raigad) हा थंडीचा आनंद घेत असताना काही दिवसांपूर्वी थंडी कमी झाली होती. मात्र पुन्हा बदललेल्या वातावरणामुळे थंडीचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात वाढलेल्या थंडीने रायगडकर गारठले असल्याने आजारालाही आमंत्रण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यात पारा आणखी घसरण्याची शक्यता:
पाकिस्तान व गुजरात येथील धूलीकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईतील अनेक भागांत हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेत मोठ्या प्रमाणावर धूलिकण साचल्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. गेल्या दहा वर्षांतील मुंबईत सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद रविवारी झाली. सहा ते सात अंशानी कमाल तापमानात घट झाली होती. मुंबईसह राज्यभरात अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कमी झालेली थंडी अचानक वाढणार आहे. येत्या दोन दिवसांत राज्यभरात किमान तापमान कमी होऊन थंडी आणखीन वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.