BJP and NCP leaders during discussions amid shifting power equations in Raigad Zilla Parishad Saam Tv
महाराष्ट्र

भाजप-राष्ट्रवादी एकत्र; शिंदेसेनेला डच्चू, मोठी राजकीय घडामोड

Maharashtra Politics:रायगडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडलाय... जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीनं शिंदेसेनेला जोरदार धक्का दिलाय...त्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद कसा चव्हाट्यावर आलाय...

Suprim Maskar

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणाचा पेच अखेर सुटलाय... भाजपने चक्क शिंदेसेनेला बाजूला करत दादांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे...त्यामुळे राज्यात ज्या महायुतीच्या जोरावर सत्ता चालवली जातेय, त्याच महायुतीत रायगडमध्ये मोठी ठिणगी पडलीय...एकीकडे विधानभवनाच्या परिसरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावले यांच्यात चर्चा झाली... मात्र या चर्चेतूनही शिंदेसेनेच्या हाती काहीच पडलं नाही....त्यामुळे रायगडचा गड जिंकण्यासाठी भाजपने रचलेल्या या चक्रव्यूहात शिंदेसेना विरोधी बाकावर बसणार का? असा प्रश्न विचारल्यावर गोगावलेंनीही त्याची तयारी दाखवलीय...

रायगड झेडपीतील पक्षीय बलाबल कसं आहे आणि सत्तासमीकरणासाठी आकड्यांचं गणित कसं बसवण्यात आलयं...रायगड जिल्हा परिषदेत शिंदेसेनेला 21, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 16, भाजपला 15, तर ठाकरेसेनेला 5 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्यात... त्यामुळे बहुमतासाठी 30 जागा लागणार असून भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यानं दोघांचे संख्याबळ 31 होतंय...

आता रायगड जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष बसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... रायगड जिल्ह्यात मंत्री गोगावले आणि तटकरे समर्थकांमधील संघर्ष अनेकदा समोर आलाय... अशातच जिल्हा परिषदेच्या निकालानंतर भाजनं शिंदेसेनेला बाजूला सारत राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्यानं शिंदेसेनेची चांगलीच कोंडी झालीय.. आता राज्यात एकत्र असलेले पक्ष जिल्हा परिषदेत आमनेसामने आल्यामुळे भविष्यात रायगडचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार? सत्तेचा हा नवा पॅटर्न महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT