Raigad : वाडगावकरांनी जपली 'संगीत नाच' कलेची 60 वर्षांची परंपरा! राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Raigad : वाडगावकरांनी जपली 'संगीत नाच' कलेची 60 वर्षांची परंपरा!

संगीत नाच कला म्हणजे सिनेमाच्या गाण्याच्या चालीवर गवळण, महाभारत, रामायण इतर धार्मिक ग्रंथातील कथेतून तयार केलेली गाणी गाऊन ही टाळ, मृदुग, पेटीच्या संगीताच्या साहाय्याने फेर धरून नाचून श्रोत्यांसमोर सादर करणे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : आपण धावरे नाच, कोकणातील बाले नाच हे पाहिले असतील पण कधी गवळण, महाभारत, रामायण कथेतून टाळ, मृदूंग आणि पेटीच्या तालावर संगीत नाच कला प्रकार पाहिला आहे का? अलिबाग तालुक्यातील वाडगाव गावातील ग्रामस्थांनी साठ वर्षापासून ही संगीत नाच परंपरा टिकवून ठेवली आहे.

गणपती, नवरात्री काळात वाडगावकर हे पूर्वी जिल्ह्यात संगीत नाच कला करीत होते. मात्र, कालानुरूप ही परंपरा लुप्त होत असली तरी वाडगावकरांनी ही कला अजून जोपासून ठेवली आहे. अलिबाग शहराला लागून असलेले वाडगाव हे गाव, या गावाला कुस्तीची परंपरा आहे; तशीच संगीत नाचाची परंपरा देखील आहे.

धावरे नाच, बाले नाच या कलेला जशी स्वतःची एक ओळख आहे, तशीच या संगीत नाचालाही जिल्ह्यात ओळख आहे. नवरात्री काळात देवीसमोर पूर्वी भजन, कीर्तन होत होती. तशी संगीत नाचालाही पूर्वी गतवैभव होते. मात्र, काळानुरूप नवरात्रीमध्ये तरुणाईमध्ये गरबा, दांडिया रास यामध्ये आवड निर्माण झाली. त्यामुळे संगीत नाच परंपरा काही प्रमाणात मागे पडली आहे. मात्र, वाडगाव ग्रामस्थांनी ही परंपरा आजही टिकवून ठेवली आहे.

संगीत नाच कला म्हणजे सिनेमाच्या गाण्याच्या चालीवर गवळण, महाभारत, रामायण इतर धार्मिक ग्रंथातील कथेतून तयार केलेली गाणी गाऊन ही टाळ, मृदुग, पेटीच्या संगीताच्या साहाय्याने फेर धरून नाचून श्रोत्यांसमोर सादर करणे. संगीत नाच कलेत आधी गणरायाचे स्तवन त्यानंतर गवळण आणि नंतर कथेतून लोकांना बोध करण्याचा मानस या संगीत नाच कलेतून सादर केला जातो.

पूर्वी संगीत नाच कलेत डबल बारी होत असे. ही बारी पाहण्यासाठी श्रोत्यांची गर्दी व्हायची. जुन्या तमाशा पट सिनेमात एकमेकाला सवाल जबाब केला जायचा तसाच या संगीत नाचमध्ये कथेतून समोरच्याला सवाल केला जायचा. त्यानंतर समोरच्या गटाने याचे उत्तर द्यायचे. मात्र, आता संगीत नाच कलेतील जाणकार व्यक्ती कमी होऊ लागल्याने डबल बारी प्रकार बंद झाला आहे.

असे असले तरी वाडगाव ग्रामस्थांनी आजही ही परंपरा टिकून ठेवली असल्याने संगीत नाचाचा गोडवा आजही आहे तसाच आहे. ही परंपरा नव्या पिढीने जपणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया नरेश कडू यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT