Tree Fell On Mumbai -Goa highway Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Rain : वादळी पावसाचा तडाखा, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प; वाहनांच्या लांबलचक रांगा

Mumbai -Goa highway: रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या वादळाचा फटका मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. माणगाव रेल्वे स्टेशनजवळ मुंबई-गोवा महामार्गावर मोठे झाड पडले.

Priya More

सचिन कदम, रायगड

मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) वाहतूक ठप्प झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे या महामार्गावर मोठे झाड कोसळले. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एकाच ठिकाणी अडकल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या वादळाचा फटका मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. माणगाव रेल्वे स्टेशनजवळ मुंबई-गोवा महामार्गावर मोठे झाड पडले. त्यामुळे या महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

महामार्गावर मोठ-मोठे कंटेनर, कार, एसटी बसेस यांची मोठी रांग लागली आहे. एकाच ठिकाणी अडकून राहिल्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदतकार्य यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या रस्त्याला पडलेले झाड बाजूला हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी रायगड पोलिसांनी देखील धाव घेतली आहे.

दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली गावानजीक रस्त्यावर मोठे झाड कोसळले आहे. झाड कोसळल्यामुळे श्रीवर्धन ते बोर्ली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे दोन्ही दिशेकडून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT