Mahendra Thorve Raigad controversy Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Politics: महेंद्र थोरवे म्हणजे रायगडमधील वाल्मीक कराड, अजित पवार गटाचा नेता आमदारावर घसरला

Mahendra Thorve Raigad controversy: रायगडमध्ये राजकारण चांगलंच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर रडकून टीका केली. महेंद्र थोरवे म्हणजे रायगडमधील वाल्मीक कराड, असं वक्तव्य त्यांनी केलं.

Priya More

सचिन कदम, रायगड

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे म्हणजे रायगडमधील वाल्मीक कराड असल्याची टीका त्यांनी केली. यासोबत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबाबत त्यांनी गंभीर वक्तव्य केलंय. एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा पळून जाऊन फितूर झालेला पक्ष असल्याचा गंभीर आरोप सुधाकर घारे यांनी केलाय.

तसंच,'पळून जाऊन सत्ता काबीज करणे म्हणजे फितुरीच आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय. अजित पवार यांनी एका तासात भाजपला पाठिंबा देत सत्तेत सामील झाले. यांच्यासारखा गोवा, गुवाहाटी असा पळून जाणारा आमचा पक्ष नाही.', अशा शब्दात सुधाकर घारे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली. आमदार महेंद्र थोरवे यांनी टेबलावर केलेल्या डान्सची त्यांनी यावेळी आठवण करून दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप करताना सांगितले की, 'महेंद्र थोरवे म्हणजे रायगडमधील वाल्मीक कराड आहेत.' महेंद्र थोरवे यांच्या कथित दादागिरी आणि गुंडगिरीचा पाढा यावेळी त्यांनी वाचून दाखवला. ० राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने सुधाकर घारे यांनी कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन थोरवेंवरती शाब्दिक हल्ला केला. दोन दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.

दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यादरम्यान आमदार थोरवे यांनी महाडमध्ये सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या जोरदार टिकेचा कर्जत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी निषेध केला. थोरवे यांनी कर्जतमध्ये भ्रष्टाचार केला आहे, थोरवे प्रशासनावर दबाव आणत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी थोरवे यांचा निषेध केला. थोरवे यांनी मतदारसंघात विकास काम केली नाहीत, त्यामुळे सुनिल तटकरे, आदिती तटकरे यांच्याविरोधात बोलून थोरवे प्रसिद्धी मिळवत असल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अन् पेन्शन कितीने वाढणार? वाचा नवीन अपडेट

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT