सचिन कदम
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र आनंद उत्सव साजरा केला जात आहे. महाराजांच्या आठवणीत अनेक शिवप्रेमी आज गड किल्ल्यांना देखील भेट देत आहेत. अशात रायगडावरून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. हिरकणी कड्यावर फिरायला गेलेले दोन तरुण अडकले आहेत.
आज सकाळी रोप वेच्या मार्गावरून जाताना स्थानिकांनी या तरूणांना पाहिले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. दोघेही कड्यावर अडकल्याचे समजताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. रायगडाच्या हिरकणी कड्यावर अडकलेल्या दोन्ही तरुणांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टिम दाखल झाली आहे.
रायगडावर फिरण्यासाठी आलेले दोन्ही तरुण हिरकणी कड्यावर आले होते. ट्रेकींग करताना ते कड्याच्या मध्यभागी आले. त्यावेळी त्यांनी खाली उतरणे किंवा पुन्हा गडावर जाणे कठीण झाले. त्यामुळे दोघेही दगडाचा आधार घेत तेथेच थांबले. मदतीसाठी रुमालाने इशारा करत होते. सध्या दोघांची सुखरुप सुटका करण्यासाठी रेस्कू टिमकडून शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत.
गड किल्ल्यांवर गेल्यावर ही काळजी घ्या
ज्या ठिकाणी फिरण्यासाठी जायचं असेल त्या भागाचा आधी भौगोलिक अभ्यास करा.
डोंगराळ भागात धुक्यामुळे दृश्यमानता कमी असते. त्यामुळे वाट शोधण्यासाठी जीपीएस सिस्टीमचा वापर करा.
गड किल्ल्यांवर शक्यतो सोबत एक गाइड किवा स्थानिक व्यक्तीला ठेवा.
गरम पाणी आणि जास्तीचा एक ड्रेस सोबत घेऊन जा.
ट्रेकिंग करताना किमान ५० मीटर लांबीचा दोर जवळ असावा.
आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रथमोपचार साधनेसोबत बाळगावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.