राजेश भोस्तेकर
रायगड : जिल्ह्यातील १०२ एसटी कर्मचऱ्याची सेवा समाप्ती कारवाई झाली असून ३८० जणांवर निलंबनाची वेळ आली आहे. तर जिल्ह्यात अडीच हजार कर्मचाऱ्यांपैकी ६५० कर्मचारी हे कामावर पुन्हा रुजू झाल्याने आठ आगारातून तुरळक प्रमाणात एसटी प्रवासी सेवा सुरू झाली आहे. (raigad-news-st-Strike-102-employees-terminated-in-Raigad-division)
एसटी महामंडळ शासनात विलनिकरण करण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी अद्यापही ठाम आहेत. शासनाकडून पगार वाढही दिली आहे. कामावर रुजू होण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब आणि शासन प्रयत्न करीत आहेत. कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायदा लावण्याची तयारीही शासनाकडून सुरू आहे. मात्र तरीही कर्मचारी हे मागण्यांवर ठाम राहिले आहेत.
पंधरा दिवसात ३६ लाखाचे उत्पन्न
एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम असल्याने प्रवाशांचे अद्यापही हाल सुरूच आहेत. रायगड जिल्ह्यात अद्याप मेस्मा अंतर्गत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचेही बारटक्के यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात तुरळक स्वरूपात सुरू असलेल्या बससेवेत आतापर्यत ३६ लाखाचा व्यवसाय पंधरा दिवसात महामंडळाचा झाला आहे. अशी माहिती जिल्हा वाहतूक नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली आहे.
साडेसहाशे कर्मचारी रूजू
रायगड जिल्ह्यातील आठ आगारातील अडीच हजार कर्मचारी हे संपात सहभागी आहे. मात्र यातील ६५० कर्मचारी हे पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. १०२ एसटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तर ३८० जणांना निलंबन करण्यात आले आहे. आता हा संप मिटवा अशी मागणी प्रवासाकडून केली जात आहे. कर्मचारी ही आता ताणून धरत असल्याने त्याचाही गिरणी कामगार होऊ शकतो अशी चर्चा आता रंगली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.