Mahad Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Mahad Water Crisis : महाडच्‍या शेलभोगावात भीषण पाणीटंचाई; विहीर पडली कोरडी, पाणी विकत घेण्‍याची ग्रामस्‍थांवर वेळ

Raigad news : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या शेल, भोगावमधील ग्रामस्‍थांना सध्‍या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या गावाला पुरेसे पाणी मिळत नाही

Rajesh Sonwane

सचिन कदम 

महाड (रायगड) : राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. रायगडच्या महाड तालुक्याच्या काही भागात देखील तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पुरेसा पाणी पुरवठा होत नसून गावाजवळ असलेली विहीर देखील कोरडी पडली आहे. परिणामी गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून तहान भागविण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. 

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या शेल, भोगावमधील ग्रामस्‍थांना सध्‍या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या गावाला पुरेसे पाणी मिळत नाही. यंदा चांगला पाऊस होऊन देखील गावच्या शेजारी असणारी विहीर जवळपास कोरडी पडली आहे. त्‍यामुळे पाण्‍यासाठी गावातील महिलांना वणवण करावी लागते आहे. पाणी आणण्यासाठी दूर जावे लागत आहे.  

पाणी योजनेचे काम अर्धवट 

उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यानंतर पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे घरातील कामं आणि मुलांचा अभ्‍यास सोडून महिलांना पाण्‍यासाठी फिराव लागत आहे. या गावाला पूर्वी नळाने पुरवठा केला जात होता. मात्र मागील दहा वर्षापासून ही योजना बंद पडली आहे. गावासाठी नव्‍याने जलजीवन योजना राबविण्यात आली आहे. मात्र तिचं काम अर्धवट स्थितीत आहे. यामुळे शेल, भोगाव या गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.  

पाणी घ्यावे लागतेय विकत 

शेल, भोगाव येथे मागील दहा वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. असे असताना देखील प्रशासनाकडून गावासाठी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी गावकऱ्यांना पाण्यासाठी कायम भटकंती करावी लागत आहे. अर्थात पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वांगणीत चाळ माफियांना दणका; 100 हून अधिक अनधिकृत घरांवर प्रशासनाने फिरवला बुलडोझर

OTT Releases: वीकेंडचा काही प्लॅन नाही? मग घरीच OTT वरच्या 'या' ७ जबरदस्त वेब सिरीजचा आनंद घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

संतापजनक! रूम रिकामी ठेवू पण मराठी लोकांना देणार नाही; मुंबईमध्ये शिंदे कुटुंबाला घर नाकारलं

Shocking: खाताना कुरकुरेचा तुकडा श्वसननलिकेत अडकला, तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT