Rain Alert Saam tv
महाराष्ट्र

Rain Alert : रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट; अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन

Raigad News : जिल्हाधिकारी किशन जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश शिर्के यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले

Rajesh Sonwane

रायगड : राज्यात अनेक भागात जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. तर पुढील दोन- तीन दिवस आणखी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात बीड, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून पूरस्थिती देखील कायम आहे. अशात काही भागात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून रायगड जिल्ह्यात देखील अतिवृष्टीचा शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

समुद्र किनाऱ्याजवळील गावांवर लक्ष

मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवरील गावांवर प्रशासनाचे अधिक लक्ष आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्याशी समन्वय साधून बचाव कार्यासाठी तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तर भरती- ओहोटीच्या वेळा तपासून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सतर्क राहण्याचे आवाहन 
शासन आणि प्रशासन सुरक्षिततेसाठी पूर्णपणे तयार असून कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. सुरक्षित ठिकाणी राहावे, जुन्या किंवा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच, गरज असल्यासच घराबाहेर पडावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जवळच्या प्रशासकीय कार्यालयाशी किंवा मदत केंद्राशी संपर्क साधावा; असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

Rain Flood : निसर्गाचं रौद्ररूप! मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत, ४४ नागरिकांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये 4000 वारकऱ्यांची सायकलवारी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

SCROLL FOR NEXT