Vinayak Mete Accident Update saam tv
महाराष्ट्र

Vinayak Mete Accident Update: विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी नवीन अपडेट; पोलिसांनी केली चालकाला अटक

शिवसंग्रामचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Vinayak mete News : शिवसंग्रामचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आज, गुरुवारी मेटे यांच्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मेटे यांचा हा अपघात झाला होता. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांच्या अपघाताचा सीआयडीमार्फत तपास सुरु होता. सीआयडीने मेटे यांच्या चालकावर विरुद्ध रसायनी पोलिस ठाण्यात सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. एकनाथ कदम असे चालकाचे नाव आहे. घटना घडली त्यावेळी घटनेत चालकाची चुकी असल्याचंही बोललं जात होते.

वेगाने गाडी चालवत असताना अंदाज न आल्याने गाडी समोर जात असलेल्या ट्रकवर आदळली होती. त्यानंतर आज, गुरुवारी विनायक मेटे अपघाती मृत्यू प्रकरणी मेटे यांचा कार चालक एकनाथ कदमला अटक केली आहे. पोलिसांनी यांनी अटक केल्यानंतर आज, गुरुवारी खालापूर कोर्टात हजर केली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर झाला होता अपघात

विनायक मेटे यांचं १४ ऑगस्ट रोजी पहाटे मुंबईला येताना अपघाती निधन झालं होतं. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पहाटे ५ :३० वाजता भातान बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली होती. मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढील भागाचा चक्काचूर झाला होता.

अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

Maharashtra News Live Update: नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

SCROLL FOR NEXT