Sharad pawar, Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

NCP News: रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; बड्या पदाधिकाऱ्याचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Political News: माणगाव तालुक्यातील विळे भागाड MIDC क्षेत्रात येणाऱ्या गावांना पिण्याचे पाणी, बेरोजगारीची मोठी समस्या होती.

Ruchika Jadhav

सचिन कदम

Raigad News:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. बड्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक आणि माणगावमधील निजामपुर ग्राम पंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी काल शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. माणगाव तालुक्यातील विळे भागाड MIDC क्षेत्रात येणाऱ्या गावांना पिण्याचे पाणी, बेरोजगारीची मोठी समस्या होती.

उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार भरत गोगावले यांनी येथील ग्रामस्थांसाठी 21 कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना मंजुर केली आणि या नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन देखील केले. या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादीचे खंदे समर्थक आणि निजामपुरचे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांसोबत शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रवेशामुळे भरत गोगावले यांच्या मताधिक्यात मोठी वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटासह सत्तेत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीला आता पुन्हा एकदा रायगडमधून मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलिसांकडून बलात्कार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव; सातारा महिला डॉक्टर प्रकरणातील ५ मोठे खुलासे

Raigad Tourism : तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर 'हे' ठिकाणे अजिबात मिस करू नका

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Phaltan Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदारासोबतच आमदाराचे नाव, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप; म्हणाले...

Airtel Cheapest Plan: एअरटेलचा बजेट-फ्रेंडली प्लॅन, वर्षभर सिम राहिल सक्रिय; किंमत किती?

SCROLL FOR NEXT