Khalapur Irshalwadi Landslide: रायगड जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी गावावर (Raigad News) बुधवारी रात्रीच्या सुमारास भलीमोठी दरड कोसळली. यामध्ये संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली दबलं असून आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अजूनही शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून आहे.
घटनास्थळी बचावपथके रवाना झाली असून आज सकाळपासूनच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. प्राथामिक माहितीनुसार, आतापर्यंत २० ते २२ जणांचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली. याबाबत गावातील एका महिलेने थरकाप उडवणारा प्रसंग सांगितला आहे.
"बुधवारी रात्री जास्तच पाऊस होता. वारा देखील मोठ्या प्रमाणात सुरू होता. आम्ही घरात बसलेलो होता. अचानक बाहेर जोरात आवाज झाला. आम्हाला वाटलं की एखादे घर कोसळलं आहे. बाहेर जाऊन बघितलं, तर संपूर्ण गावंच मातीच्या ढिगाऱ्याखाली (Landslide) दबलं होतं".
"त्यात माझ्या शेजारील घरंही होती. आम्ही आरडाओरड करत होतो. मी माझ्या पतीला आणि दोन मुलांना ताबडतोब घेऊन गावाबाहेर पडले, असा थरकाप उडवणारा प्रसंग दुर्घटनेतून बचावलेल्या महिलेने सांगितला आहे".
दरम्यान, अंधार आणि पावसामुळे माती निसरडी झाल्यानं वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला बचावकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी उजेडात मदत आणि बचावकार्य जोमानं सुरु केलं जाणार आहे.
सध्या २५ जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून ५ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप १०० हून अधिक जण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.