Raigad News Saam tv
महाराष्ट्र

Ganesh Visarjan Rally : विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट, डीजे, डॉल्बीवर बंदी; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Raigad News : मिरवणुकीत डीजे किंवा लेझर लाईटचा वापर करून बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार संबधित दोशींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आदेशातुन दिला

Rajesh Sonwane

सचिन कदम

रायगड : सध्या गणेशोत्सव सुरु असून गणेश भक्तांचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. या गणेशोत्सवात अनेक जिल्ह्यामध्ये डीजे, डॉल्बी व लेझर लाईट वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानुसार आता गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटच्या वापरावर रायगडमध्ये बंदी घालण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी तसे आदेश जारी केले आहेत.  

लाडक्या गणरायाचे स्वागत करताना मोठ्या मंडळांकडून स्वागत मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यात डीजेचा वापर करण्यात आला होता. मात्र यामुळे होणार त्रास लक्षात घेता राज्यात अनेक ठिकाणी या उत्सवाच्या काळात डीजे वापरण्यावर बंदी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी लेझर लाईटचा वापर देखील करण्यास मनाई आहे. तर आता गणेश विसर्जन मिरवणुकीत देखील याचा वापर होण्याची शक्यता असल्याने रायगड जिल्हाधिकारी यांनी बंदीचे आदेश काढले आहेत. 

मिरवणुकीत यावर असणार बंदी  

लेझर लाईटची तिव्रता आणि त्याचे डोळे आणि आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर हि बंदी घलण्यात आली आहे. गणेशोत्सव आता शेवटच्या टप्प्यात असून पाच दिवस, सात दिवसांच्या गौरी गणपती आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणूका मोठ्या प्रमाणात निघणार आहेत. यावेळी गणेश मंडळ आणि आयोजकांनी मिरवणुकांदरम्यान लेझर लाईट, ध्वनीक्षेपकांचा दणदणाट, डॉल्बी, स्नो/हिट स्प्रे याचा वापर करून नये असे निर्देश दिले आहेत.  

तर होणार कायदेशीर कारवाई 

दरम्यान विसर्जन मिरवणुकीत होणार डीजेचा वापर करण्यावर बंदी करण्यात आली आहे. या ऐवजी ढोल- ताशांचा वापर मंडळांना करावा लागणार आहे. मिरवणुकीत डीजे किंवा लेझर लाईटचा वापर करून बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार संबधित दोशींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशातुन दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhopuri Actress Photos: कोण आहे ही सुंदरा? जिच्या सौंदर्याचा इंटरनेटवर जलवा

शिवसेना महिला नेत्याच्या नवऱ्यावर प्राणघातक हल्ला, एकनाथ शिंदेंनी घेतली रूग्णालयात भेट, नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांना योग्य उसाचा दर द्या, नाहीतर आंदोलन अटळ – रविकांत तुपकर|VIDEO

Maharashtra Live News Update: मंत्री छगन भुजबळ यांच्या महाएल्गार मेळाव्याला धनंजय मुंडे राहणार उपस्थित

Gold Rate: १ Kg सोन्याच्या किंमतीत खासगी विमान, प्रसिद्ध बिझनेसमनच्या पोस्टने भुवया उंचावल्या, पाहा नेमकं गणित मांडलं कसं?

SCROLL FOR NEXT