Bribe Saam tv
महाराष्ट्र

Bribe: महिला पोलिसाने मागितली १ लाखाची लाच; लाचलुचपत विभागाकडून अटक

महिला पोलिसाने मागितली १ लाखाची लाच; लाचलुचपत विभागाकडून अटक

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

रायगड : चोरीच्या गुन्ह्यातुन वाचण्यासाठी महिला पोलिसाने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबतच्‍या तक्रारीवरून (ACB) लाचलुचपत विभागामार्फत महिला पोलिस कर्मचारीस अटक करण्यात आली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील माणगावमधील ही घटना आहे. (Raigad News Bribe Case)

चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला मदत करून बाहेर काढण्यासाठी महिला (Police) पोलिस कर्मचारी हिने एक लाख रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केल्या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये समोर आले आहे. या प्रकरणी रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात असुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या महिला पोलिस कर्मचारी हिस अटक करून चौकशीची कारवाई सुरु केली आहे. कुंजन धर्मेश जाधव (वय 32) पोलीस नाईक, नेमणुक माणगाव पोलिस ठाणे असे या आरोपीत महिला पोलिस कर्मचारी हिचे नाव आहे.

तडजोडीअंती ९० हजार रूपये

फिर्यादीच्या चोरीच्या गुन्ह्याच्या पडताळणीचे वेळी आरोपी हिने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 90 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. यावरून सदर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: 'माहिती नाही आम्ही पुन्हा येणार...' सामना जिंकल्यानंतर रोहितनं दिले निवृत्तीचे संकेत

Diabetes Control Drink: रिकाम्या पोटी प्या हे 3 Morning Drinks, काही तासात होईल Blood Sugar कंट्रोल

Facebook: फेसबूक अकाउंट सुरक्षित ठेवायचं कसं? 'असं' करा प्रोफाइल लॉक

Maharashtra Live News Update: अकोल्यात तब्बल 2 तास मुसळधार पाऊस

Satara News: डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील 'त्या' खासदार आणि पीएवर कारवाई व्हावी; भाजप आमदाराची मागणी

SCROLL FOR NEXT