Raigad News  Saam Tv
महाराष्ट्र

Raigad News: तलावात पोहायला उतरले पण बाहेर आलेच नाहीत, २ मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Alibaug 2 children by drowning in lake: तलावामध्ये पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अलिबागमध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. या दोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

Priya More

सचिन कदम, रायगड

रायगडमधून (Raigad) एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अलिबागमध्ये (Alibaug) दोन मुलांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झालाय. तलावामध्ये पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. या दोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्याचे काम स्थानिक गावकरी आणि बचाव पथकाकडून सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वीच रायगडच्या खालापूरमध्ये धरणामध्ये बुडून ४ तरुणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज दोन मुलांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे पर्यटन स्थळी जाताना तरुणांनी काळजी घेण्याचा आवाहन केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील तलावामध्ये दोन मुलं बुडाली आहेत. तलावात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुलं पाण्यामध्ये बुडाली. बेपत्ता मुलांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातून विविध बचाव पथकांना पाचारण करण्यात आले आहे. अथर्व हाके आणि शुभम बाला अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. अथर्वचा मृतदेह शोधण्यात स्थानिकांना यश आले तर शुभमचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, २१ जून रोजी रायगडमधील खालापूर तालुक्यामध्ये धरणामध्ये बुडून ४ तरुणांचा मृत्यू झाला होता. वावर्ले गावच्या पोखरवाडी येथे ही घटना घडली होती. सत्य साईबाबा ट्रस्टकडून हे धरण बांधण्यात आले होते. धरणामध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. चारही तरुण मुंबईमधील रिझवी कॉलेजमधील होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT