Raigad News Saam tv
महाराष्ट्र

Raigad News : पुण्‍यातून बेपत्ता तरुणाचा रायगडमध्ये सापडला मृतदेह; पर्यटकांना बॅग सापडल्याने झाला खुलासा

Devkund Waterfall Raigad: पोलिसांकडून शोध सुरु असतानाच हरवलेल्‍या तरुणाचा मृतदेह रायगडच्या देवकुंड धबधब्याच्या परिसरात सापडला आहे.

Rajesh Sonwane

सचिन कदम

रायगड : काही दिवसांपूर्वी पुण्‍याच्‍या कोथरूड भागातून १९ वर्षीय तरुण बेपत्ता झाला होता. या तरुणाचा पोलिसांकडून शोध सुरु असतानाच रायगडच्या देवकुंड धबधब्याच्या परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पुणे पोलिसांना देखील माहिती देण्यात आली असून पुढील कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

पुण्याच्या (Pune) कोथरूड परिसरातील विराज फड (वय १९) असे मृतदेह सापडलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान विराज फड हा कोथरूड परिसरातून काही दिवसांपूर्वी हरवला होता. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आलेली होती. यावरून पोलिसांकडून शोध सुरु असतानाच हरवलेल्‍या तरुणाचा मृतदेह रायगडच्या (Raigad News) देवकुंड धबधब्याच्या परिसरात सापडला आहे.  

पर्यटकांना बॅग दिसल्याने लागला शोध 

रायगड जिल्ह्यातील ताम्‍हीणी घाटातील व्‍ह्यू पॉइंट परीसरात पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. त्यानुसार येथे पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांना याठिकाणी एक बॅग आढळून आली. सदरच्या बॅगेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता पोलीसांच्‍या मदतीने बॅगमधील मोबाईल सुरू केला असता तो विराज फड याचा असल्‍याचे समजले. यानंतर विराज हा पुण्यातून बेपत्ता असल्याचे समोर आले. 

त्‍यानंतर या भागातील दरीमध्‍ये विराजचा शोध सुरू झाला. यासाठी वेगवेगळी बचाव पथके, ॲडव्‍हेंचर टीम, वनविभाग, पोलीस यंत्रणा शोधकार्य करत होते. शोध सुरु असतानाच खोल दरीत बचाव पथकाला विराज याचा मृतदेह आढळून आला. यानंतर मृतदेह स्‍ट्रेचर आणि दोराच्‍या सहाय्याने दरीतून बाहेर काढण्‍यात आला. या पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'माझे लग्न लावून द्या' अविवाहित तरूणाचं भाजप आमदाराला पत्र; ४३ व्या वर्षीही पठ्ठ्या सिंगल

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT