Raigad ST Bus Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Raigad Accident: रायगडमध्ये २ एसटी बसची समोरासमोर धडक, चालकांसह १५ ते २० प्रवासी जखमी

Raigad ST Bus Accident: अलिबाग ते रेवदंडा मार्गावर दोन एसटी बसला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले. तर १५ ते २० प्रवासी जखमी झालेत.

Priya More

सचिन कदम, रायगड

रायगडमध्ये एसटी बसला भीषण अपघात (Raigad ST Bus Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही एसटी बसचे चालक गंभीर जखमी झाले असून एसटी बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रायगड पोलिसांकडून (Raigad Police) अपघाताचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग ते रेवदंडा मार्गावर दोन एसटी बसला अपघात झाला. नवेदर बेली येथील वळणावर दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही एसटी बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. तर एसटी बसमधील १५ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोन्ही बसच्या चालकांची प्रकृती गंभीर आहे. तर इतर प्रवाशांना जास दुखापत झाली नाही पण त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामध्ये दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. रायगड पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिला; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT