Anil Navgana Car Attack Case Saam Tv
महाराष्ट्र

Raigad News: अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Anil Navgana Car Attack Case: माणगाव पोलिसांनी आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. माणगाव पोलिसांकडून (Mangaon Police) या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Priya More

सचिन कदम, रायगड

शिवसेना ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे (Anil Navgane) यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आता माणगाव पोलिसांनी आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. माणगाव पोलिसांकडून (Mangaon Police) या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अनिल नवगणे यांच्या कारवर गुरुवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले ते वीर या गावादरम्यान दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीमध्ये त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. या कार हल्ल्यामध्ये अनिल नवगणे हे थोडक्यात बचावले पण त्यांचा चालक जखमी झाला. हा हल्ला विकास गोगावले यांनी केला असल्याचा आरोप अनिल नवगणे यांनी केला होता. हल्ल्याच्या वेळी विकास गोगावले हे घटनास्थळी हजर असल्याचे नवगणे यांनी सांगितले होते.

या घटनेनंतर रात्री उशिरा अनिल नवगणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह माणगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी माणगाव पोलिसांनी आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यासह 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल केला. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या घटनेमुळे रायगडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रायगडमधील राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, महाडमध्ये गुरूवारी रात्री शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा होती. या सभेला अनिल नवगणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत आले होते. या सभेत भाषण करताना त्यांनी भरत गोगावले यांच्यासह त्यांचा मुलगा विकासवर गंभीर आरोप केले होते. सभा झाल्यानंतर ते इंदापूर येथील घराच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मुंबई-गोवा महामार्गावरील टेमपाले ते वीर या गावादरम्यान त्याच्या कारवर काही अज्ञातांनी लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला केला आणि दगडफेक केली. चालकाने कार पळवली त्यामुळे ते बचावले. या घटनेत नवगणे सुखरूप आहेत पण त्यांचा चालक जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT