Raigad Fort Madar Morcha Saam Tv
महाराष्ट्र

Sambhajiraje Chhatrapati: यांच्या पुढाकारानंतर त्या प्रार्थना स्थळाचे काम थांबले

शिवभक्ती राजेंच्या निदर्शनास आणून दिला हाेता प्रकार.

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

रायगड : दुर्गराज किल्ले रायगडवरील (raigad) मदार मोर्चा येथील प्रकाराबाबत संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी पुरातत्व विभागाला पत्र दिल्यानंतर तेथे सुरु असलेले काम तात्काळ थांबविण्यात आले आहे. (raigad fort illegal construction stopped immediately after letter from sambhajiraje chhatrapati)

किल्ले रायगडाच्या पायरीच्या मार्गावर मदर मोर्चा (madar morcha) हे ठिकाण आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अज्ञात लोकांनी या ठिकाणी हिरवे कापड, फुलांची चादर, पांढरा रंग देऊन अनधिकृत प्रार्थना स्थळ बनवण्याचा प्रयत्न सुरु केला. हा प्रकार सोशल मिडीयावर (Social Media) मांडत अनेकांनी नेमके तिथे काय सुरु आहे असा प्रश्न उपस्थित केला हाेता. खासदार संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chattrapati) यांच्यापर्यंत देखील या प्रकाराची माहिती पाेहचली. राजेंनी पूरातत्व खात्यास पत्राद्वारे हा प्रकार तात्काळ थांबविण्यात यावा अशी मागणी केली.

खासदार संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांच्या पत्राची केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती जी व मुंबई विभागाचे अधीक्षक पुरात्वशास्त्रज्ञ राजेंद्र यादव यांनी तातडीने दखल घेतली. सध्या पुरातत्त्व विभागाने मदार मोर्चा (Raigad Fort Madar Morcha) येथील रंगरंगोटी हटवून ते ठिकाण पूर्ववत केलेले आहे. याबराेबरच या ठिकाणी आता सुरक्षा रक्षकाची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Beed Crime : मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकाची मारहाण, ट्युशनवरून येताना अडवले अन्...

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

SCROLL FOR NEXT