केंद्र सरकार विरोधात रायगड जिल्हा महिला काँग्रेस आक्रमक राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

केंद्र सरकार विरोधात रायगड जिल्हा महिला काँग्रेस आक्रमक

यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी महिला पदाधिकाऱ्यांनी केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : केंद्रातील भाजप सरकारमुळे देशामध्ये सात वर्षात महागाईने उचांक गाठला आहे. इंधन, खाद्यतेल, गॅस दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आणि महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे याच्या सूचनेनुसार रायगड जिल्हा महिला काँग्रेसने आज केंद्र इंधन दरवाढीविरोधात अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन केले.

यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी महिला पदाधिकाऱ्यांनी केली. निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांना महिला शिष्टमंडळाने आपल्या मागण्याचे निवेदन दिले. Raigad District Women's Congress is aggressive against the Central Government

हे देखील पहा -

पेट्रोल शंभरी तर डिझेल नव्वदी पार झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर नीचांकी असताना देशात इंधन दर दिवसेंदिवस वाढत आहेत. डिझेल वर 18 रुपये रस्ते विकास सेस व 4 रुपये कृषी सेस घेतला जात आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दरही हजार रुपयांपर्यत पोहचत आहे.खाद्यतेलाचे भावही 200 रुपये लिटरवर पोहचले आहेत.डाळीचे भावही प्रचंड वाढले आहेत. केंद्र सरकारच्या या नियोजनशून्य कारभारामुळे महागाईचा फटका हा सर्वसामान्यांना बसला आहे.

इंधन, खाद्यतेल, गॅस दरवाढ कमी करण्याबाबत भाजप सरकार कोणतीही पावले उचलताना दिसत नाही. याविरोधात आज जिल्हा महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षा, कोकण प्रभारी सुदर्शना कौशिक, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा ऍड श्रद्धा ठाकूर, अलिबाग महिला अध्यक्षा सुजाता पाटील, माथेरान वर्षा शिंदे, मोनिका पाटील, दीपाली म्हात्रे, विदुला खेडेकर आदी महिला पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT