Raigad Crime Saam tv
महाराष्ट्र

Raigad Crime : मंदिरात चोरी करणारे पोलिसांच्या ताब्यात; चोरट्याने बांग्लादेशातील बँकेत वर्ग केली रक्कम

Raigad News : आरोपी मागील चार वर्षापासून वेठबीगारीच्या कामासाठी सीबीडी बेलापूर येथे व्यास्तव्यास असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

Rajesh Sonwane

सचिन कदम 
रायगड
: खालापूर तालुक्यातील २ मंदिरातील दानपेट्या फोडणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना खोपोली पोलिसांनी (Police) बेड्या ठोकल्या आहेत. (Raigad) त्यांच्याकडून ७ लाख २ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान या चोरट्यांनी आतापर्यंत रायगड ते गोवा या किनार पट्टीवर अनेक मंदिरात डल्ला मारल्याची बाब तपासात समोर आली आहे.

अलिबाग- खोपोली (Alibag) येथील खालापूर तालुक्यातील दोन मंदिराची दानपेटी फोडून पळ काढलेल्या चार अट्टल चोरट्याना खोपोली पोलिसांनी बेड्या (Crime News) ठोकल्या आहेत. राजू फरत शेख (वय २७), इम्रान शहीद शेख (वय २४), राकीब कुलमोहंमद शेख, (वय २८) व  मुजाहिद गुलजार खान (वय २८) अशी आरोपीतांची नावे आहेत. इम्रान आणि राकीब हे दोघेही मुळ राहणारे बांग्लादेशचे असल्याचा अंदाज असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे. हे चारही आरोपी मागील चार वर्षापासून वेठबीगारीच्या कामासाठी सीबीडी बेलापूर येथे व्यास्तव्यास असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

खोपोली येथील तेज फार्म हाऊसजवळ असणाऱ्या बहिरी देव मंदिर येथे २५ एप्रिलला रात्री आणि शीलफाटा-खोपोली येथील श्री हनुमान मंदिर येथे २६ एप्रिलला रात्री या चौघांनी मंदिरांचे दरवाजे तोडून मंदिरातील दानपेट्या फोडून सुमारे १८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याच्या घटना घडलेल्या होत्या. त्याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनांचे गांभीर्य ओळखून तांत्रिक तपासाच्या आधारे चोरी करणाऱ्या आरोपींचा मार्ग काढून खोपोली येथून पनवेल येथपर्यंत सर्व प्रथम पाठलाग केला. परंतू तत्पूर्वीच आरोपी पनवेल येथून निसटले होते.

त्यानंतर गोवा येथे पोहोचल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथक  गोवा येथे पोहोचून म्हापसा येथे आरोपींचा शोध सुरु केला. त्यावेळी तपास पथकास म्हापसा, गोवा येथे एका मोठ्या मंदिरामध्ये मोठ्या रक्कमेची चोरी झाल्याची माहिती मिळाली. ही चोरी देखील याच आरोपींनी केल्याची खात्री झाली. त्यावेळी हे आरोपीत सावंतवाडी येथे पोहोचल्याची माहिती मिळाल्याने तपास पथक तातडीने सावंतवाडी येथे पोहोचले व तेथे चारही आरोपीतांना शिताफीने ताब्यात घेतले. अटक आरोपी राजू फरत शेख याने त्याच्या वाट्याला आलेल्या रक्कमेपैकी १ लाख ३३ हजार रुपये इतकी रोख रक्कम नातेवाईकाच्या बांग्लादेश येथील एका बँक अकाऊंटमध्ये वर्ग केली असल्याचेही तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Awas Yojana : घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! ₹8 लाखांच्या लोनवर मिळणार इतकी व्याजाची सवलत

Second hand car: या 7 गोष्टी तपासल्याशिवाय सेकंड हँड गाडी खरेदी करू नका

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांची दोन ठिकाणी आंदोलन सुरू..

Tree : घरापासून 'ही' ६ झाडे दूरच ठेवा, नाहीतर...

Best Foods For Kidney: दररोजच्या आहारात 9 गोष्टींचा करा समावेश, तुमची किडनी कधीच खराब होणार नाही!

SCROLL FOR NEXT