Raigad Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Crime : शिक्षकी पेशाला काळिमा! गुप्तांगाला हात लावला अन्...; दहावीच्या विद्यार्थावर लैंगिक अत्याचार

Raigad Crime News : रायगडच्या महाडमध्ये खाजगी क्लासमध्ये शिक्षकाने १०वीतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • महाडमध्ये शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचाराचा आरोप

  • POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल

  • पालकांमध्ये संताप

  • कठोर कारवाईची मागणी

सचिन कदम, रायगड

एकीकडे महाराष्ट्रात भोंदू बाबांचे घाणेरडे कृत्य समोर येत असताना दुसरीकडे गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. रायगडच्या महाडमध्ये खाजगी शिकवणीच्या शिक्षकाने १०वीत शिकणाऱ्या मुलावर अत्याचार केले आहेत. या प्रकाणी महाड शहर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, सदर घटना २०२४-२५ मध्ये घडली आहे. यावेळेस पीडित मुलगा १०वीच्या वर्गात शिकतं होता. त्याने शिक्षक सुनिल गांधी याच्याकडे खाजगी क्लास लावले होते. या शिकवणीला जाताना सुनिल गांधी या लिंग पिसाट शिक्षकाने मुलावर अमानुष अत्याचार केले.

या वेळी शिक्षकाने मुलाच्या गुप्तांगाला हात लावत त्याला उत्तेजित करून अमानवी कृत्य केले. नराधम शिक्षक इतक्यावरच न थांबता त्याने क्लासच्या वरती स्वतःच्या बेडरूममध्ये नेऊन पीडित मुलाच्या अंगावर झोपून अश्लिल चाळे केले असल्याचे मुलाने म्हटले. याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तसेच या शिक्षकाच्या अटकेबद्दल पालकांकडून जोरदार मागणी होत असून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान आता या शिक्षकाला काय शिक्षा होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या प्रकरणाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रील की जीवाशी खेळ? वाढदिवसाला पेट्रोल ओतून रस्त्यावर लावली आग

Virar Tourism : मुंबईकरांनो 'विरार'मध्ये लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा, वीकेंडला घ्या घोडेस्वारीचा आनंद

Banana Bread Recipe: टी-टाइम स्नॅकसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि स्वादिष्ट मऊ बनाना ब्रेड, वाचा रेसिपी

Maharashtra heatwave : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा तडाखा; ४८ वर्षीय महिलेचा मृत्यू, VIDEO

Monday Horoscope: गोड बोलून कामं पूर्ण करा, 5 राशींवर असणार शंकराची कृपा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT