Raigad Black Magic News Saamtv
महाराष्ट्र

Raigad Black Magic News: पैशाचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी कृत्य... विद्येच्या मंदिरात जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार; ७ जणांना अटक

Raigad Roha Black Magic: या प्रकरणात रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

सचिन कदम, प्रतिनिधी...

Raigad News: अंधश्रद्धेतून जादूटोण्याचा अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातून समोर आले आहे. रोहा तालुक्यातील एका खाजगी शाळेत पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पूजा केल्याची उघडकीस आले आहे. या प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Raigad Latest News Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, रायगड (Raigad News) जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील धामणसई गावातील एका खाजगी शाळेत पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पुजा विधी केली जात असल्याचे उघडकीस झाले आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या उद्देशाने रत्नागिरीहून आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी हे कृत्य केले.

या सर्वांनी धामणसई गावातील शाळेत आणि स्मशानामध्ये फुलं, अबीर, गुलाल, बिबवा , लिंबू, टाचण्या व काळी बाहुली अशा अघोरी वस्तूंच्या सहाय्याने पूजन केले. गावातील मारुती मंदिरामध्ये नारळ फोडण्यात आले. हा सर्व प्रकार पाहून येथील ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारले असता उडवा उडवीची उत्तर दिली.

या प्रकरणी संशय आल्याने धामणसई ग्रामस्थांनी याबाबतची माहिती रोहा पोलिसांना देत सहा जणांना पकडून दिले तर कोलाड येथून एकाला रोहा पोलिसांनी ताब्यात घेतले. पकडलेल्या सर्व आरोपींविरोधात रोहा पोलिस ठाण्यात अंध्दश्रध्दा निर्मुलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस निरिक्षक प्रमोद बाबर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Bribe News : पुण्यात खळबळ! प्रमोशनसाठी बड्या अधिकाऱ्याने घेतली तब्बल ४० कोटींची लाच; कॉल रेकॉर्डिंग आले समोर

High Blood Pressure Risk: सायलेंट किलर! लक्षणांशिवाय वाढतोय 'BP'चा धोका; डॉक्टरांनी सांगितले ५ गंभीर संकेत

Vande Bharat sleeper : मुंबई-पुणे-बंगळुरू वंदे भारतचा मार्ग ठरला, तिकिटाच्या किंमतीही समोर, वाचा लेटेस्ट अपडेट

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढली; रजिस्ट्रेशन कसं कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवऱ्याची क्रूरता... बेदम मारहाण करत बायकोच्या गुप्तांगामध्ये घातले 10 इंच ब्लेड

SCROLL FOR NEXT