Raigad Politics News Bharat Gogawale Aditi Tatkare  Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Raigad Politics : गोगावलेंचा तटकरेंना जोरदार धक्का, कट्टर नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

Local body elections Maharashtra 2025 political updates : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भरत गोगावले यांनी तटकरेंच्या कट्टर समर्थक विकास गायकवाड यांना शिवसेनेत प्रवेश करून घेतलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश मोठा मानला जात आहे.

Namdeo Kumbhar

Vikas Gaikwad joins Shiv Sena Raigad latest news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल काही दिवसातच वाजणार आहे. निवडणुकीआधी राजकीय पक्षांकडून आकड्याची जुळवाजुळव केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक विरोधकांनी सत्ताधारी पक्षात जाहीर प्रवेश केला आहेच. पण आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरेंना जोरदार धक्का दिला आहे. तटकरेंचा कट्टर समर्थक अन् राष्ट्रवादीचा नेत्याचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. (Bharat Gogawale Vs Aditi Tatkare Raigad Politics News)

मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना गोरेगाव लोणेरे जिल्हा परिषद मतदार संघात मोठा धक्का दिला आहे. तटकरे यांचा कट्टर समर्थक, कार्यकर्ता अन् स्थानिक नेता विकास गायकवाड याने आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वपूर्ण मानला जात आहे. या प्रवेशामुळे ऐन जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर गोरेगाव विभागात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. मंत्री भरत गोगावले , जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. मंत्री भरत गोगावले यांचा हा दिवाळी धमाका मानला जातोय.

पुढील काही दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था होणार आहे. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन सत्ताधारी पक्षामध्ये वर्चस्वाची लढाई लागणार आहे. या दोन पक्षामध्येच खरी लढत असल्याचे रायगडमध्ये बोलले जात आहे. तटकरे अन् गोगावले यांच्यातील संघर्ष रायगड अन् महाराष्ट्रासाठी नवीन नाही. गेल्या काही वर्षांपासून या दोन दिग्गजांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या जात आहेत. आता शिवसेनेकडून राष्ट्रवादीला मोठा हादरा दिलाय. तटकरेंकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी हा तटकरेंना मोठा धक्का मानला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

६० लिटर पाण्यात ९०० किमी धावणार कार? इराणच्या वैज्ञानिकाचा व्हिडिओ व्हायरल, वाचा नेमकं सत्य काय

रात्री झोपताना मोजे घालून झोपल्यास मृत्यू होतो?

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Maharashtra Road Accident : ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर; वेगवेगळ्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

Washim : चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी; शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उबाठाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT