Raigad News  Saam TV
महाराष्ट्र

Raigad: सहाय्यक गट विकास अधिकारी 15 हजाराची लाच घेताना अटक...

पंडित राठोड हे रोहा पंचायत समिती कार्यालयात सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: विभागीय चौकशीमध्ये तक्रारदार याच्या बाजूने अहवाल पाठविण्यासाठी मागितलेल्या पंधरा हजार लाचेप्रकरणी रोहा पंचायत समितीचा सहाय्यक गटविकास अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. अलिबाग रायगड (Alibaug-Raigad) लाच लुचपत पथकाने सहाय्यक गट विकास अधिकारी पंडित कौरु राठोड यास दहा हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे रोहा पंचायत समितीमधील अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

पंडित राठोड हे रोहा पंचायत समिती कार्यालयात सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. पंडित याच्याकडे तळ्याचा अतिरिक्त कार्यभार ही होता. तक्रारदार याच्या विरोधात कोकण भवन येथे एका प्रकरणाबाबत विभागीय चौकशी सुरू आहे. तक्रारदार याच्या प्रकरणात आरोपी पंडित हे चौकशी अहवाल सादर अधिकारी म्हणून नेमलेले होते.

तक्रारदार याच्या प्रकरणातील अहवाल आरोपी यांना तयार करून कोकण भवन येथे पाठवायचा होता. आरोपी पंडित यांनी तक्रारदार याच्या बाजूने अहवाल पाठविण्यासाठी 15 हजाराची लाच तक्रारदार याच्याकडे मागितली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी 2022 रोजी तक्रारदार यांनी पाच हजार पंडित यांना दिले होते.

उर्वरित दहा हजार रुपयांची मागणी पंडित यांनी तक्रारदार याच्याकडे केली. तक्रारदार यांनी याबाबत अलिबाग येथे 24 मार्च रोजी लाचलुचपत कार्यालयात येऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार आज 25 मार्च रोजी लाचलुचपत पथकाने रोहा पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला.

आरोपी यांनी तक्रारदार याच्याकडून पंचासमक्ष 10 हजार रुपये स्वीकारताना पथकाने झडप घालून त्यांना अटक केली. लाच लुचपत विभागाच्या उपविभागीय अधिकारी सुषमा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित गलांडे पोह कौस्तुभ मगर, महिला पोना स्वप्नाली पाटील, पोना जितू पाटील यांनी ही यशस्वी कारवाई केली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

Sanjay Raut: मुंब्रात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू, संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर!

Nachos Chaat At Home Recipe: घरच्याघरी बनवा हेल्दी नाचोस चाट; नोट करा सिंपल रेसिपी

Vargamantri: निवडणुकीच्या धामधूमीत आता "वर्गमंत्री" कोण होणार? ट्रेलर आला समोर

Parineeti Chopra: नवीन चित्रपटासाठी परिणीतीचा नवा लूक, केसांना कलर देत चाहत्यांना दिली बातमी

SCROLL FOR NEXT