Rahuri Ahikyanagar viral video police beatin Saam
महाराष्ट्र

धक्कादायक! नगरमध्ये पोलीस कर्मचार्‍याला कपडे फाटेपर्यंत मारले, ७-८ जणांनी खाकीवर उचलला हात, व्हिडिओ आला समोर

Rahuri Ahikyanagar viral video police beating : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे ७-८ जणांच्या टोळक्याने पोलिस कर्मचारी विकास वैराळ यांना कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Namdeo Kumbhar

सचिन बनसोडे, अहिल्यानगर प्रतिनिधी

Rahuri mob attack on police constable viral video : अहिल्यानगरमध्ये खाकीवर हात उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुरीमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याला ७ ते ८ जणांनी बेदम मारहाण (Assault) केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. सात ते आठ जणांनी पोलिसाला कपडे फाटेपर्यंत मारल्याचे व्हिडिओत दिसत आहे. पोलीस कर्मचाऱ्याला कोणत्या कारणामुळे मारले? ७-८ जण इतके आक्रमक का झाले होते? पोलिसाला मारत असताना दुसरा पोलिस तिथेच पाहत का थांबला? याचा तपास (Investigation) केला जात आहे. मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव विकास वैराळ असे आहे.

राहुरीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अहिल्यानंतरमध्ये हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. प्रत्येकजण पोलिसाला का मारले? त्यानं नेमकं काय केलं होतं? खाकीवर हात का उचलला गेला? याचीच चर्चा राहुरी आणि अहिल्यानगरमध्ये चहाच्या टपरीपासून ते कट्ट्यांवर अन् घराघरात सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल (Case Registered) केला असून तपास केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३ जणांच्या मुसक्या आवळल्या (Arrested) आहेत. तर ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात सात ते आठ जणांच्या टोळक्याने कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जमावाने एका इमारतीसमोरच विकास वैराळ या पोलीस कर्मचाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसतेय. पोलिसांनी या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात ४ जणासह ११ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले आहे. तर इतर ७ जणांचा शोध घेतला जात आहे.

७-८ जणांच्या टोळक्याने पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात विकास हे गंभीर जखमी झाले आहेत. संतप्त जमावाकडून मारहाण सुरू असताना काहीजणांनी मध्यस्थी करत वाद सोडवला. त्यांनी जखमी पोलिसांना तात्काळ पोलिसांच्या गाडीत बसवून रवाना केले आहे. जखमी पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या मारहाणीचे नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

Cardio Workout at Home: घरच्या घरी करा कार्डिओ वर्कआउट; फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या ७ एक्सरसाइज बेस्ट

Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

Pune : गे डेटिंग ॲपवर तरुणाला ओळख करणं पडलं महागात; भेटायला बोलावलं अन् भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT