Udayanraje Bhosale on Rahul Solapurkar  Saam Tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : 'राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला', छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, उदयनराजेंचा संताप

Udayanraje Bhosale on Rahul Solapurkar : अभिनेते राहुल सोलापूरकरांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून खासदार उदयनराजे प्रचंड संतापले आहेत. ते नेमकं काय म्हटले आहेत पाहूयात.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Udayanraje Bhosale : राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र प़डसाद उमटले. दुसऱ्या दिवशी मात्र हे प्रकरण निवळण्याऐवजी आणखीच चिघळलं..कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजेंनी राहुल सोलापूरकरांना गोळ्या घालण्याची भाषा केलीय.

उदयनराजे एवढ्यावरच थांबले नाहीत. तर इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा प्रवृत्तींना शोधून ठेचून काढायला हवं अशी उद्विग्न भावनाही त्यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर त्यांनी सोलापूरकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान वाद टोकाला गेल्यामुळे राहुल सोलापूरकरांनी आपल्या वादग्रस्त विधानाबाबत शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

आधी भाजप नेते सुधांशू त्रिवेदी त्यानंतर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेक नेते अभिनेत्यांनी महापुरुषांवर चिखलफेक केलीय. आता उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सरकार सोलापूरकरांवर काय कारवाई करणार याकडे लक्ष्य लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT