kolhapur , Navratri 2023 saam tv
महाराष्ट्र

Ambabai Mandir: अंबाबाई मंदिरात चित्रणास जिल्हाधिकाऱ्यांनी घातली बंदी; नव्या आदेशाने कोल्हापुरात नाराजीचा सूर

Navratri Festival 2023 : नव्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार चांगलेच संतापले आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Ambabai Mandir News : साडेतीन शक्तीपीठापैकी महत्त्वाचे पीठ असणाऱ्या काेल्हापूरातील अंबाबाई देवीचा नवरात्र उत्सव (kolhapur navratra utsav 2023) उद्यापासून सुरु होणार आहे. त्यादृष्टीने अंबाबाई मंदिरात नवरात्रीची तयारी अंतिम टप्यात आली आहे. (Maharashtra News)

दरम्यान कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर (rahul rekhawar) यांनी माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यांना आणि छायाचित्रकराना मंदिरात प्रवेश नाकारला आहे. या दडपशाही विरोधात आज (शनिवार) कोल्हापूर प्रेस क्लबच्या (kolhapur press club) वतीने आई अंबाबाईच्या (ambabai) दारात जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पालकमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार चांगलेच संतापले आहेत.

दरवर्षी नित्यनियमाने सर्व पत्रकार नवरात्र उत्सवाच्या काळात आई अंबाबाईचे सर्व सोहळे कोट्यावधी लोकांच्या पर्यंत पोहोचवत असतात. अस असताना देखील जिल्हाधिकारी आई अंबाबाई देवीचं शूटिंग घ्यायला का परवानगी नाकारतायेत याचे गौड बंगाल काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची बदली करा

त्यामुळे मनमानी कारभार करणाऱ्या जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची ताबडतोब बदली करून मंदिरात माध्यम प्रतिनिधी आणि कॅमेरामन यांना वृत्तांकन करण्यासाठी कायमस्वरूपी परवानगी मिळावी अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने शीतल धनवडे (अध्यक्ष कोल्हापूर प्रेस क्लब) यांच्यासह पत्रकारांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT