Rahul Gandhi phone call to Rahul Bondre over BJP entry saam tv
महाराष्ट्र

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

Rahul Bondre Cancels BJP Switch After Rahul Gandhi's Call: महाराष्ट्रात राहुल गांधींचं पहिल्यांदाच 'डरो मत कॅम्पेन' यशस्वी झालंय. राहुल गांधींनी एका कॉलवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपप्रवेश रोखलाय. राहुल गांधी आणि माजी आमदारामध्ये नेमका काय संवाद झालाय?... कोण आहेत हे माजी आमदार?... राहुल गांधींनी कोणता मोलाचा सल्ला दिलाय?...

Snehil Shivaji

ऐकलंत...दोन दिवसांपूर्वी चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रेंची ही घोषणा....तुम्हाला वाटलं असेल आतापर्यंत ते भाजपात गेलेही असतील...मात्र थांबा....त्यापूर्वी एक भयंकर हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पाडण्याची भाजपची जय्यत तयारी पाण्यात गेली. भाजप प्रवेशाचे जिल्ह्यात आणि मुंबईत थेट बॅनर लावून भाजपच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेले काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे राहुल गांधीच्या एका फोननंतर कसे माघारी परतले त्यासाठी पाहा राहुल गांधीं आणि राहुल बोंद्रेंचा फोनवरील संवाद ...

राहुल गांधींच्या याच एका फोनने बोंद्रेंचा कंठ दाटून आला. याफोननंतर कालपर्यंत भाजपमध्ये जाणाऱ्या बोंद्रेंनी एक फेसबुक पोस्ट करत कॉग्रेंसमध्ये राहणार असल्याचं जाहिर केलं. राहुल बोंद्रेंची फेसबुक पोस्ट बचेंगे तो और भी लढेंगे.... राहुल गांधी यांच्या लढ्यात सर्वस्व अर्पण करण्याची तयारी....!

चिखलीत भाजप आमदार श्वेता महाले आणि त्यांचे पती, म्हणजेच मुख्यमंत्र्यांचे पीएस विद्याधर महाले यांनी २०२९ च्या निवडणुकीतला आपला मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी संपवून जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्वासाठी तयारी पुर्ण केली. पण ज्या बोंद्रेंसाठी महालेंनी तयारी केली होती त्या बोंद्रेंची राजकीय कारकिर्द एकदा पाहा,

कोण आहेत राहुल बोंद्रे?

2009 आणि 2014 मध्ये सलग दोन वेळा काँग्रेस आमदार

2014 च्या मोदी लाटेतही बोद्रेंना मतदारांची पसंती

भाजपच्या श्वेता महालेंशी कडवा संघर्ष

सहकार आणि बँक क्षेत्रात मोठा दबदबा

गांधी घराण्याशी एकनिष्ठ म्हणून ओळख

बुलढाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघाचे २००९ अन् २०१४ असे सलग २ वेळा आमदार मोदी लाटेतही बोद्रेंना लोकांनी पसंती देत विधानसभेत पाठवलं. भाजपच्या श्वेता महालेंशी त्यांचा अटीतटीचा सामना देखिल झाला आणि महालेंचा 2019 आणि 2024 ला निसटता विजय झाला. सहकार, बँक, सूत गिरणी आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून चिखलीत बोंद्रेंची मजबूत पकडये. गांधी घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध असून कॉग्रेंसचे एकनिष्ठ अशी ओळख राज्यात आहे. सध्या राज्यात कुठल्याही निवडणुका नसताना, एका माजी आमदाराचा पक्षप्रवेश रोखण्यासाठी थेट गांधींना स्वतः फोन करावा लागला, यावरून राहुल बोंद्रेंचा बुलढाण्यात असणारा प्रभाव स्पष्टये. पण बोंद्रेंना भाजपमध्ये घेण्यासाठी कसा त्रास दिला गेला यावर विजय वडेट्टीवारांनी केलेले आरोपांनी खळबळ माजवलीये.

बोंद्रे भाजपात गेले असते, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच कॉंग्रेसला मोठा हादरा बसला असता. आता सर्व काही गमावण्याची तयारी ठेवून बोंद्रे काँग्रेसमध्येच थांबलेत. त्यामुळे आता त्यांच्यावर आणि त्यांच्या संस्थावर खरंच कारवाई होते का हे पाहणं महत्वाचंय, ऐनवेळी बोंद्रेंनी भाजपच्या हातावर तुरी दिल्याने राजकीय वातावरण पेटलंय इतकं मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यानं पक्षाला ठोकला रामराम, तडकाफडकी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

राममंदिरानंतर लालबागमध्येही दानपेटीवर डल्ला? आधी कार्यकर्त्यांची मुजोरी आता दानाची चोरी?

दुष्काळाची घोषणा शनिवारी? मुख्यमंत्र्यांचा बुधवारपासून दुष्काळ भागाचा दौरा

सरकारनं शेतकऱ्यांसाठी खूप केलंय, विजबीलही येत नाही; गिरीश महाजनांचा दावा

प्रत्येक कुटुंबात एकाला मिळणार सरकारी नोकरी? सरकारची 'एक परिवार-एक नोकरी योजना

SCROLL FOR NEXT